शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

डायलिसिस, रक्तपेढी, मोबाइल अ‍ॅम्ब्युलन्स सेवा देण्याचा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 01:21 IST

महापौर नंदकुमार घोडेले यांनी मनपाच्या आरोग्य विभाग अधिका-यांची बैठक घेऊन डायलिसिस, रक्तपेढी, मोबाइल अ‍ॅम्ब्युलन्स, कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स, डेन्टल हॉस्पिटल सुरू करण्याबाबत चर्चा केली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी महानगरपालिकेने तयारी सुरू केली आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी मनपाच्या आरोग्य विभाग अधिका-यांची बैठक घेऊन डायलिसिस, रक्तपेढी, मोबाइल अ‍ॅम्ब्युलन्स, कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स, डेन्टल हॉस्पिटल सुरू करण्याबाबत चर्चा केली. या सुविधा जनतेसाठी उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच निर्णय होईल, असे महापौर घोडेले यांनी सांगितले.दोन तास झालेल्या या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असल्याचे महापौर घोडेले यांनी सांगितले. पूर्णवेळ आरोग्य अधिकारी म्हणून संध्या टाकळीकर यांची नियुक्ती करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले.डॉक्टरांनी पूर्ण वेळ रुग्णालयात थांबावे, सकाळच्या सत्राप्रमाणेच दुपारचे सत्र सुरू केले जाईल. तसेच डायलिसिसची सेवा सिडकोच्या रुग्णालयात सुरू केली जाईल. बन्सीलालनगरात १० खाटांचे रुग्णालय, एक्स-रे मशीन, शवपेटी, स्वर्गरथ यासह अनेक सुविधा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मलेरिया विभागासाठी सरकारकडून आरोग्य अधिका-याची मागणी केली जाणार आहे. सध्या मलेरिया विभागात २० फॉगिंग मशीन, ५ जीपमधील मशीन, दीडशे फवारणी पंप कार्यरत असून, ७० कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यातआले आहेत, असे महापौरांनी सांगितले.