तुळजापूर : आगामी नवरात्र महोत्सवासाठी येणाऱ्या भक्तांची सोय व्हावी, यासाठी मंदिर परिसरातील रस्ते, विविध भाषेतील फलक तयार करणे, ओळखपत्र अनिवार्य, पिण्याच्या पाण्याची सोय आदी कामे कमरण्यासाठी मंदिर संस्थान, पोलिस आणि नगर पालिकेने नियोजनबद्ध काम करून आदर्श घडवावा, असे निर्देश श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशां नारनवरे यांनी दिले आहेत.तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात मंदिर संस्थांनच्या वतीने नवरात्र महोत्सव पूर्वतयारीच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस पोलिस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रियंका भगत (नारनवरे) मंदिर संस्थानचे तहसीलदार सुजित नरहरे, नगर परिषद मुख्याधिकारी राजीव बुबणे, पोलिस निरीक्षक ज्ञानोबा मुंडे, नायब तहसीलदार एन. एस. भोसिकर, आपत्ती व्यवस्थापन समितीच्या समन्वयिका वृषाली तेलोरे, मंदिर संस्थानचे दिलीप नाईकवाडी यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. नारनवरे म्हणाले की, नवरात्र महोत्सव काळात भाविकांची संख्या लक्षात घेवून सर्व विभागांनी त्यांना दिलेल्या कामांबाबत जागरूक राहून जबाबदारी पार पाडावी. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी एकाच ठिकाणी होवू नये म्हणून बॅरेकेटींग करावे, ठिकठिकाणी स्वच्छता व शौलयाच्या सोयी व पाणी उपलब्ध करून देण्यात यावे. पार्कींग नो पार्कींग झोन तयार करण्यात यावेत. त्याचप्रमाणे यात्रेकरू ज्या ठिकाणवरून येणार आहेत, त्या ठिकाणचे नकाशे व माहितीपत्रक तयार करून नियोजन करावे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. बैठकीनंतर डॉ. नारनवरे यांनी तुळजापूर विकास प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी करून कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत सर्वसंबंधितांना निर्देशित केले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)
नियोजनात्मक काम करून आदर्श घडवा
By admin | Updated: September 10, 2015 00:30 IST