शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मला रुग्णालयातून सुटी हवी म्हणजे हवी..! ओमायक्रॉन बाधिताचा अजब हट्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 19:38 IST

Omicron Variant : तो दुबईहून शहरात १७ डिसेंबरला शहरात आला. त्याचा जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर महापालिकेच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

औरंगाबाद : दुबई वारी करून शहरात आलेल्या तरुणाला ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले होते. या रुग्णावर चिकलठाणा येथे महापालिकेच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. १४ दिवसांनंतर रुग्णाला घरी सोडावे, अशी केंद्र शासनाची नियमावली असताना हा तरुण मला कुठलाही त्रास नाही, त्यामुळे सुटी हवी म्हणजे हवीच, असा हट्ट धरून बसला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन पेचात सापडले आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून याबाबत निर्देश मिळविण्याचा प्रयत्न प्रशासनाने सुरू केला आहे.

शहरात ओमायक्रॉन विषाणूचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी या दोघांचा जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यातील एकजण औरंगाबादमधील मूळ रहिवासी व सध्या इंग्लंडमध्ये स्थायिक असलेल्या कुटुंबातील सदस्य आहे. त्यांची मुलगी मुंबईतच पॉझिटिव्ह आली होती, तर वडील औरंगाबादला आल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह निघाले. दुसरा रुग्ण सिडको एन-७ येथील रहिवासी आहे. तो दुबईहून शहरात १७ डिसेंबरला शहरात आला. त्याचा जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर महापालिकेच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मंगळवारी त्याचा दहावा दिवस होता. पण गेल्या दोन दिवसांपासून तो सुटीसाठी प्रशासनावर प्रचंड दबाव आणत आहे. कुठलीही तीव्र लक्षणे नसताना हॉस्पिटलमध्ये ठेवताच कशाला? मी घरी विलगीकरणात राहतो, असे सांगून त्याने डॉक्टरांना भंडावून सोडले असल्याचे सूत्रांनी सांगितले. महापालिकेने यासंदर्भात राज्याच्या आरोग्य विभागाला अधिक तपशील पाठवून दिला. त्याचप्रमाणे केंद्रालाही रिपोर्ट करण्यात आला.

तरुण ‘ओमायक्राॅन’मुक्तदरम्यान, दुबईहून शहरात परतल्यानंतर ओमायक्राॅनबाधित आढळलेल्या ३३ वर्षीय तरुणाचा सोमवारी रात्री कोरोना तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. या तरुणाला बुधवारी मेल्ट्राॅनमधून सुटी देण्यात येणार असून, ७ दिवस होम क्वारंटाईन केले जाईल, अशी माहिती मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. पारस मंडलेचा यांनी दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादOmicron Variantओमायक्रॉन