शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये जिल्हाधिकारी म्हणून अडीच वर्षांत खूप शिकायला मिळाले : उदय चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 14:25 IST

प्रभारी जिल्हाधिकारीपदी अनंत गव्हाणे यांच्याकडे सूत्र

ठळक मुद्देछोटेखानी समारंभात जिल्हाधिकारी चौधरी यांना निरोप

औरंगाबाद : जिल्ह्याचे मावळते जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना नियोजन समितीच्या सभागृहात एका छोटेखानी कार्यक्रमात मंगळवारी निरोप देण्यात आला. जिल्हाधिकारी पदाची सूत्रे अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांच्याकडे सोपविण्यात आली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळण्याचा प्रयत्न करीत निरोप समारंभ पार पडला. बुधवारी चौधरी हे मुंबईला मुख्य सचिव कार्यालयात उपसचिव पदाचा पदभार घेतील. दरम्यान या आठवड्याच्या अखेरीस जिल्हाधिकारी म्हणून कोण येणार, या चर्चेला शासनस्तरावरून विराम मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

निरोप समारंभाप्रसंगी केलेल्या सत्काराला उत्तर देताना चौधरी म्हणाले, जेव्हा अभ्यास करून यश मिळत नसे, त्यावेळी नाराज व्हायचो; पण आई मला सांगायची सगळ्यात एक चांगले कौशल्य असते. त्याचा उपयोग कर आणि आज त्यानुसार काम करीत  आहे. आजवरच्या १० वर्षांच्या कारकीर्दीत औरंगाबादला खूप शिकलो. रुजू झाल्यावर कचरा प्रश्न, मराठा आरक्षण आंदोलन, लोकसभा, विधानसभा निवडणूक, दुष्काळ, अतिवृष्टी असे अनेक मुद्दे हाताळले. लोकप्रतिनिधी व सर्व सहकाऱ्यांमुळे काम करता आले. प्रभारी जिल्हाधिकारी गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांच्यासह प्रशासनातील अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादTransferबदली