शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मी अस्वस्थतेला शब्द देतो : बालाजी सुतार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 13:10 IST

बी. रघुनाथ पुरस्कार  वितरण साधेपणाने 

ठळक मुद्देबालाजी सुतार यांनी यावेळी सद्य:स्थितीवर भाष्य केले व लेखनामागची प्रेरणा सांगितली.

औरंगाबाद : मी अस्वस्थतेला शब्द देतो, असे उद्गार प्रसिद्ध कथाकार बालाजी सुतार यांनी सोमवारी येथे काढले. यंदाचा ‘बी. रघुनाथ पुरस्कार’ स्वीकारताना ते बोलत होते. 

नाथ समूहाच्या कार्यालयात अत्यंत साधेपणाने हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. नाथ समूहाचे चेअरमन नंदकिशोर कागलीवाल यांच्या हस्ते रोख ११ हजार रुपये, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सुतार यांचा सन्मान करण्यात आला. कोरोना आपत्तीमुळे यावर्षी नाथ संध्या हा कार्यक्रमही रद्द करण्यात आला. मागील २१ वर्षांपासून नाथ समूह आणि परिवर्तन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

बालाजी सुतार यांनी यावेळी सद्य:स्थितीवर भाष्य केले व लेखनामागची प्रेरणा सांगितली. ‘सरलेलं शतक आणि चालू शतक यांच्या सांध्यावरचा हा अस्वस्थ करणारा कालखंड. या काळाला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न एक लेखक म्हणून मी करीत असतो,’ असे त्यांनी सांगितले. प्रा. डॉ. दासू वैद्य यांनी पुरस्कार निवडीमागची भूमिका स्पष्ट केली. आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही पातळीवर बालाजी सुतार यांचे लेखन अवला आहे, असे ते म्हणाले. श्रीकांत उमरीकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. प्रा. अजित दळवी, अनुया दळवी, लक्ष्मीकांत धोंड, डॉ. आनंद निकाळजे, नीना निकाळजे व प्रा. मोहन फुले यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी सतीश कागलीवाल, सुनील देशपांडे, राजेंद्र जोशी, संतोष जोशी, शिव फाळके आदींची प्रमुख उपस्थिती होती. .............

टॅग्स :literatureसाहित्यAurangabadऔरंगाबाद