शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी धरणावरील जलविद्युत प्रकल्प बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:34 IST

‘एनओसी’ नाही : गोदापात्रातील बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे कारण

संजय जाधवपैठण : जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात जलसाठा असताना धरणावरील जलविद्युत प्रकल्प महिनाभरापासून संबंधित विभागास बंद ठेवावा लागला आहे. यामुळे महिनाभरापासून या विद्युत प्रकल्पातून एकाही युनिटची भर विद्युत निर्मितीत पडलेली नाही. जायकवाडी प्रशासनाने विद्युत प्रकल्प चालू करण्यासाठी ‘एनओसी’ दिली नसल्याने विद्युत प्रकल्प बंद ठेवण्यात आला असल्याचे जलविद्युतचे कार्यकारी अभियंता उन्मेश पाटील यांनी सांगितले. दरम्यान, जायकवाडी प्रशासनाच्या वतीने गोदापात्रातील चनकवाडी बंधाºयाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने विद्युत प्रकल्प बंद ठेवावा, असे आदेश विद्युत विभागास देण्यात आले आहेत, असे जायकवाडी प्रशासनाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जायकवाडी धरणातून विद्युत निर्मिती केल्यानंतर गोदावरी पात्रात पाणी सोडले जाते. हे पाणी खाली वाहून जाऊ नये म्हणून धरणाच्या खाली पाच किलोमीटर अंतरावर चनकवाडी येथे बंधारा बांधून पाणी थोपविण्यात आले आहे. दरम्यान, या बंधाºयाच्या खाली गोदावरी पात्रात आपेगाव येथे मोठा बंधारा बांधण्यात आला आहे. चनकवाडी बंधाºयाच्या गेटचे काम सुरू असल्याने विद्युत निर्मिती थांबविण्यात आली आहे. वास्तविक पाहता यानंतर लगेचच आपेगाव बंधारा असल्याने विद्युत निर्मितीनंतर सुटलेले पाणी या बंधाºयात थोपवले जाणार आहे. असे असतानाही केवळ पाणी वाया जाऊ नये म्हणून विद्युत निर्मिती बंद ठेवण्याचा निर्णय मोठा अजब असल्याचे मानले जात आहे.गोदावरी पात्रातील चनकवाडी बंधाºयाच्या गेट दुरुस्तीचे काम तब्बल महिनाभरापासून सुरू आहे. जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वतीने अत्यंत संथगतीने बंधाºयाच्या दुरुस्तीचे काम करण्यात येत असून यामुळे महिनाभरापासून जलविद्युत प्रकल्प बंद ठेवण्यात आला आहे. जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात जलसाठा असताना विद्युत निर्मिती बंद ठेवण्याची दुर्दैवी वेळ विद्युत विभागावर आली आहे.आपेगाव, हिरडपुरीसाठी पाणीसोडा -शेतकºयांची मागणीदरम्यान, जायकवाडी धरणातून आपेगाव व हिरडपुरीसाठी पाणी सोडा, अशी आग्रही मागणी शेतकºयांतून होत असून आपेगावच्या जि.प. सदस्या शिल्पा ज्ञानेश्वर कापसे व पैठण तालुक्यातील पदाधिकाºयांनी शासकीय स्तरावर केली आहे. यापूर्वीही जायकवाडी धरणातून आपेगाव व हिरडपुरीसाठी जायकवाडी प्रशासनास पाणी सोडावे लागले होते. यंदाही गोदाकाठच्या गावात टंचाई निर्माण झाल्याने पाणी सोडावेच लागणार आहे. त्यामुळे विद्युत निर्मितीनंतर गोदावरी पात्रात सुटणारे पाणी वाया जाणार नाही हे निश्चित आहे. या परिस्थितीत केवळ पाणी वाया जाणार म्हणून विद्युतप्रकल्प बंद ठेवण्याचा निर्णय जायकवाडी प्रशासनाने घेतल्याने विद्युत निर्मितीत तोटा झाला आहे.१२ मेगावॅट क्षमतेचा जायकवाडी धरणावरील जलविद्युत प्रकल्प आहे. या प्रकल्पातून जलविद्युत निर्मिती करताना जायकवाडी धरणातून पाणी गोदावरी पात्रात सोडले जाते. सोडलेले पाणी रात्रीच्या वेळेस पुन्हा प्रकल्पाचे टर्बाईन उलटे फिरवून गोदावरी पात्रातील पाणी धरणात ओढले जाते. या प्रक्रियेने पाण्याची बचत तर होतेच; परंतु गोदावरी पात्रात भाविकांना नेहमी स्वच्छ पाणी उपलब्ध राहते. महिनाभरापासून जलविद्युत प्रकल्प बंद पडला असून, धरणातून पाणी सुटणे व परत धरणात ओढण्याची प्रक्रिया बंद पडली आहे.आठ-पंधरा दिवसांत सुरू होणारचनकवाडी बंधाºयाची दुरुस्ती सुरू असून आणखी आठ ते पंधरा दिवसांचा कालावधी दुरुस्तीसाठी लागू शकतो. दुरुस्ती होताच जलविद्युत प्रकल्प सुरू होईल.-अशोक चव्हाणधरण अभियंता, जायकवाडी

टॅग्स :electricityवीजDamधरण