शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
5
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
6
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
7
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
8
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
9
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
10
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
11
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
12
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
13
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
14
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
15
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
16
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
17
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
18
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
19
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
20
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा

जलविद्युत प्रकल्प सुरू

By admin | Updated: August 10, 2016 00:27 IST

पैठण : पाण्याच्या कमतरतेसह तांत्रिक कारणामुळे गेल्या वर्षभरापासून बंद असलेला जायकवाडी धरणावरील जलविद्युत प्रकल्प सोमवारपासून (दि.८) सुरू करण्यात झाला आहे.

पैठण : पाण्याच्या कमतरतेसह तांत्रिक कारणामुळे गेल्या वर्षभरापासून बंद असलेला जायकवाडी धरणावरील जलविद्युत प्रकल्प सोमवारपासून (दि.८) सुरू करण्यात झाला आहे. यामुळे जायकवाडी धरणाच्या खाली गोदावरी पात्रात पाणी सोडणे व गोदापात्रातील पाणी परत धरणात ओढणे ही प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे गोदाकाठी धार्मिक विधी करणाऱ्यांत समाधानाचे वातावरण पसरले आहे.जायकवाडी प्रकल्पावरील जल विद्युत गेल्या वर्षी तांत्रिक बिघाडामुळे बंद पडला होता. त्यातच १४ मार्च २०१६ पासून जायकवाडी जोत्याखाली गेल्यामुळे हा प्रकल्प सुरू होऊ शकला नव्हता. जायकवाडीत पुरेसा पाणी साठा होताच, हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पातून १२ मेगावॅट विजेची निर्मिती होते. ही वीज नॅशनल ग्रीडला पुरविली जाते. जायकवाडी धरणात अपेक्षित जलसाठा झाल्यामुळे यंदा धरणातून सिंचनासाठी ठरल्याप्रमाणे रोटेशन देता येणार आहे. यामुळे जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांत मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून जायकवाडीत येणाऱ्या पाण्याचा येवा घटला असून, अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून नाममात्र पाणी जायकवाडीत दाखल होत आहे. गोदावरी व प्रवराचे मिळून जायकवाडीत सोमवारी २६,६६६ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू होती. ती मंगळवारी १३,००० क्युसेक्स एवढी घटली आहे. जायकवाडी धरणात मंगळवारी सायंकाळी ४९.६६% जलसाठा झाल्याचे धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. यामुळे येथील धरण समूहातून विसर्ग नाममात्र ठेवण्यात आले. यामुळे गोदावरी पात्रात नांदुर मधमेश्वर धरणातून मंगळवारी केवळ १५,८४६ क्युसेक्स विसर्ग होत होता. नगरच्या पाण्याचा दिलासा अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरणातून सोडलेले पाणी रविवारी दुपारी गोदावरी नदीला प्रवरा संगम येथे येऊन मिळाले. मुळा धरणातून मंगळवारी ६,००० वरून ७,००० क्युसेक्स विसर्ग करण्यात आला. ओझर वेअरमधून सोडण्यात आलेला २,८३० क्युसेक्सचा विसर्ग मंगळवारी ५,६६१ करण्यात आला, हे पाणी जायकवाडी धरणात दाखल होत आहे.