शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

हायब्रीड जातींनी संपविले ‘फूल आणि फुलांवरील भ्रमरांचे नाते’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 11:39 IST

ना कोणता सुगंध, ना त्यामध्ये कोणता मकरंद...

ठळक मुद्देगुलाब फुलांपासून दूर जात आहेत, भ्रमर आणि इतर कीटकमहाराष्ट्रात गावरान गुलाबासाठी पोषक वातावरण नाही.

- रुचिका पालोदकर 

औरंगाबाद : ‘व्हॅलेंटाईन डे’ची सगळ्यात सोपी, सुंदर आणि स्वस्तातील भेट म्हणजे गुलाबाची फुले. या फु लांमुळे दोन प्रेमी जीव एकत्र येत असले तरी ‘फूल आणि फुलांवरील भ्रमर’ हे नाते मात्र कायमचे दुरावत आहे. ना कोणता सुगंध, ना त्यामध्ये मकरंद. यामुळे बागेत फुललेले शेकडो हायब्रीड गुलाब पाहूनही बिचाऱ्या भ्रमराची परिस्थिती मात्र ‘दुरून फुले साजिरे’ अशीच आहे.

गावराण गुलाब आता बघायलाही मिळत नसल्यामुळे गुलाबालाही सुगंध असतो, हे येणारी पिढी कदाचित विसरूनही जाईल. वरवर बघता हा प्रकार अगदी किरकोळ वाटत असला, तरी याचा दूरगामी परिणाम फुलांवर वाढणारे भ्रमर, मधमाशा आणि पराग कणांचे सिंचन करणाऱ्या कीटकांच्या अनेक जाती- प्रजाती यांच्यावर होतो आहे. हा एक अतिसुक्ष्म रुपातील पर्यावरणीय परिणाम आहे, असे पर्यावरण अभ्यासक सांगतात. फुले आणि त्यातही गुलाबांच्या फुलांना कायमच मागणी असते. गावरान गुलाबासाठी १५ डिग्री सेल्सिअस इतके कमी तापमान लागते. त्यामुळे महाराष्ट्रात गावरान गुलाबासाठी पोषक वातावरण नाही. म्हणूनच वाढती मागणी आणि पुरवठा यात समतोल साधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हायब्रीड गुलाब वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. व्हॅलेंटाईन डे, लग्नसराई, सणासुदीचे दिवस या काळात तर मागणी खूप जास्त वाढलेली असते. त्यामुळे एका गुलाबासाठी साधारण १५ ते २० रुपये एवढी किंमत मोजावी लागते.

रसायनांचा अधिक मारागावरान गुलाब हा कोणत्याही औषधाविना येतो. मात्र त्याचे आयुष्य कमी असल्यामुळे  आज बाजारात ८० ते ९० टक्के हायब्रीड  गुलाबच दिसतो आहे. आपल्या पुढच्या पिढीला गावरान गुलाब कदाचित बघताही येणार नाही. रसायनांच्या वापरामुळे हायब्रीड गुलाब जास्त टिकतात. पण रसायनांच्या अतिवापरामुळे या फुलांमधील मकरंद गावरान फुलांप्रमाणे नसतो. त्यामुळे भुंगे किंवा अन्य कीटकांचा त्यावर निभाव लागणे शक्य होत नाही. रसायनयुक्त मकरंद मधमाशांसाठी प्राणघातक ठरतो. शास्त्रज्ञ आइनस्टाईनच्या मते मधमाशा नष्ट झाल्या तर अवघ्या चार वर्षांत मानवी जात नष्ट होऊ शकते, यावरून या गोष्टीचे गांभीर्य लक्षात येते.                    - मिलिंद गिरधारी

भ्रमरांचा रसभंगहायब्रीड गुलाबांमध्ये इसेन्शिअल अ‍ॅरोमॅटिक आॅईलच्या ग्लॅण्डस् एकतर नसतात किंवा मग फार कमी असतात. मकरंद कमी असतो. त्यामुळे पराग सिंचन करणारे  कीटक याठिकाणी येत नाहीत. आले तरी आॅईल आणि मकरंद न मिळाल्याने त्यांचा भ्रमनिरास होतो. हायब्रीड फुले फक्त  शोभिवंत असतात. त्यातून त्यांना काहीही मिळत नाही. पण मराठवाड्यातील तापमान आणि आजची फु लांची गरज पाहता, हायब्रीड फुले लावणे गरजेचे झाले आहे. - प्रा. अरविंद धाबे 

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेAurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्र