शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘पती शैलेंद्रनेच स्वत:ला मारून घेतले’; पोलीस कोठडीतील पूजा राजपूतचा जबाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 18:13 IST

उद्योजक शैलेंद्र राजपूत खून प्रकरण 

ठळक मुद्देदोन्ही मुलींचा जबाब ठरणार महत्त्वाचा

औरंगाबाद : उद्योजक पती शैलेंद्र शिवसिंग राजपूत यांचा चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या पूजा राजपूतने आपण पतीला मारलेच नाही, उलट शैलेंद्रनेच स्वत:ला मारून घेतल्याचे वारंवार सांगत आहे, पूजा राजपूत स्वत:ला वाचविण्यासाठी खोटे बोलत असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, पूजाविरोधात आणखी पुरावे गोळा करण्यात पोलीस अधिकारी व्यग्र आहेत.

उल्कानगरीतील खिंवसरा पार्कमधील मे-फेअर या उच्चभ्रू वसाहतीत राहणारे उद्योजक शैलेंद्र राजपूत यांची सोमवारी मध्यरात्री त्यांच्या घरात चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. शैलेंद्रचे भाऊ सुरेंद्र यांनी दिलेल्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलीस ठाण्यात पूजा राजपूतविरोधात पतीच्या हत्येचा गुन्हा नोंदविला. संशयावरून पोलिसांनी पूजाला अटक केली आहे. तेव्हापासून पूजा जवाहरनगर पोलिसांच्या कोठडीत आहे. अटके नंतर तब्बल २४ तास पूजा कोणासोबतही बोलली नाही. ती शांतपणे बसून होती.

पोलिसांनी शैलेंद्रच्या खुनासंदर्भात तिची चौकशी केली तेव्हा शैलेंद्रचा खून मी केलाच नाही, असे ती म्हणत आहे. हा खून नाही, तर शैलेंद्रनेच रागाच्या भरात स्वत:ला चाकू मारून घेतल्याने अति रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे ती पोलिसांना सांगत आहे. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी ती पोलिसांना असेच सांगत आहे. असे असले तरी पूजा राजपूत बचावात्मक दृष्टिकोनातून पोलिसांना असे सांगत असावी, असा संशय पोलीस अधिकाऱ्यांना असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. पतीच्या हत्येपासून स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न पूजाकडून होत असला तरी, परिस्थितीजन्य पुरावे तिच्याविरोधात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. शैलेंद्रचा भोसकून खून केल्यांनतर स्वच्छ करून ठेवलेला चाकू पोलिसांनी हस्तगत केला. शिवाय खूनप्रसंगी रक्ताने माखलेले कपडे बदलल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 

दोन्ही मुलींचा जबाब ठरणार महत्त्वाचाशैलेंद्र आणि पूजा यांच्या ६ आणि १६ वर्षीय वयाच्या दोन्ही मुली घटनेच्या रात्री घरीच होत्या. यामुळे त्यांचा जबाब या गुन्ह्याचा तपासात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. वडिलांचा खून आणि आईला पोलिसांनी अटक केल्याचे समजल्यापासून दोन्ही मुली मानसिक धक्क्याखाली आहेत. परिणामी पोलिसांना त्यांचे म्हणणे नोंदविता आले नाही. दोन्ही मुलींचा जबाब घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.