शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा ब्लेडने गळा कापणाऱ्यास जन्मठेप  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 19:26 IST

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून पत्नी द्वारकाबाईचा ब्लेडने गळा चिरून खून करणारा तिचा पती ठकुबा तुकाराम भागवत याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश  एस.एस. भीष्मा यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

औरंगाबाद : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून पत्नी द्वारकाबाईचा ब्लेडने गळा चिरून खून करणारा तिचा पती ठकुबा तुकाराम भागवत याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश  एस.एस. भीष्मा यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

सिल्लोड तालुक्यातील पिंपळपेट येथील ठकुबा तुकाराम भागवतचे लग्न द्वारकाबाईसोबत घटनेच्या तेरा वर्षांपूर्वी झाले होते. ठकुबाला दारूचे व्यसन होते. तो कायम नशेत राहत होता. तो कामधंदा करत नसल्यामुळे उदरनिर्वाहासाठी द्वारकाबाई वीटभट्टीवर काम करत होती. दारूच्या नशेत तर्रर्र असलेल्या ठकुबाने दारू पिण्यासाठी पत्नीला पैसे मागितले. 

पैसे दिले नाही तर जिवे मारून टाकतो, अशी धमकी त्याने १४ नोव्हेंबर २०१५ रोजी दिली होती. त्याच दिवशी सायंकाळी त्याने पत्नीला दारू पिण्यासाठी पैसे मागितले. द्वारकाबाईने पैसे देण्यास नकार दिल्यावर तिला बेदम मारहाण करत तिच्या गळ्यावर ब्लेडने वार केला. ती मदतीसाठी आरडाओरड करत घराबाहेर आली. मात्र,अधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे मरण पावली. 

द्वारकाबाईचे मामा कैलास सीताराम वाघ (रा. वडोद बाजार) यांच्या तक्रारीवरून ठकुबा विरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीअंती न्यायालयाने  ठकुबाला भादंवि कलम ३०२ अन्वये दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा आणि ५ हजार रूपये दंड ठोठावला.

टॅग्स :Courtन्यायालयAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस