उंदिरवाडी येथील पती-पत्नी गट नंबर ७९ मधील शेतात पाइप टाकण्यासाठी गेले होते. त्यावेळी गोपाळा राजाराम कदम हा साथीदारांसह काठ्या, लोखंडी गज घेऊन तेथे आला. त्याने दोघा पती, पत्नीला मारहाण करीत महिलेचा विनयभंग केला. तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सदर महिलेच्या फिर्यादीवरून गोपाळ राजाराम कदम, निवृत्ती आसाराम कदम, भगवान मच्छिंद्र कदम, अरुण मच्छिंद्र कदम, लक्ष्मण निवृत्ती कदम, रामा निवृत्ती कदम, दत्तू राजाराम कदम, ताराचंद काशीनाथ कदम व अन्य दहा, अशा एकूण अठरा जणांविरुद्ध शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार आर.आर. जाधव हे करीत आहेत. दरम्यान, गुन्हा उशिरा दाखल करण्याबाबत विचारले असता तांत्रिक कारणामुळे गुन्हा उशिरा दाखल झाला असून, संबंधित आरोपीविरुद्ध यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक गोरख शेळके यांनी सांगितले.
शेतात पाइप टाकण्याच्या कारणावरून पती-पत्नीला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:04 IST