शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पहिला डोस संपविण्याची घाई; रोज नियोजन शंभरचे, लसीकरण दोनशे जणांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 19:36 IST

corona vaccination शहरातील एका मोठ्या रुग्णालयातील केंद्रावरच रोज ३०० जणांना लसीकरणाचे नियोजन करण्यात आले.

ठळक मुद्दे२७ जानेवारी रोजी १०० जणांचे नियोजन असलेल्या क्रांतिचौक अंतर्गत केंद्रावर १३५ जणांचे लसीकरण झाले, लसीकरणाच्या पोर्टलवर नोंदणी केलेले आरोग्य कर्मचारी आले नाही, तर इतर कर्मचाऱ्यांना लस देता येत आहेत.

औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून काही केंद्रांवर रोजच्या नियोजनापेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होत आहे. एका केंद्रावर १०० आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे नियोजन असताना, प्रत्यक्षात लसीकरण दोनशे जणांना होत आहे. त्यामुळे पहिला डोस १५ फेब्रुवारीपूर्वी संपविण्यासाठी ही घाई होत आहे का, प्रत्येक आरोग्य कर्मचारी अर्धा तास निगराणीत थांबत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

लसीकरणाच्या पहिल्या दिवशी १६ जानेवारी रोजी को-विन अ‍ॅप डाऊनलोड होऊ शकले नाही. त्यामुळे ऑफलाइन प्रक्रिया करण्यात आली, परंतु त्यानंतर ऑनलाइन पद्धतीनेच लसीकरणाची प्रक्रिया करण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार, प्रत्येक केंद्रांवर १०० जणांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. शहरातील एका मोठ्या रुग्णालयातील केंद्रावरच रोज ३०० जणांना लसीकरणाचे नियोजन करण्यात आले. उर्वरित ठिकाणी १०० कर्मचाऱ्यांना डोस देण्याचे नियोजन आहे, परंतु यातील काही केंद्रांवर त्यापेक्षा अधिक लसीकरण होत असल्याची परिस्थिती आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस १५ फेब्रुवारीपर्यंत देण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमाेर आहे. त्यातूनच नियोजनापेक्षा अधिक लोकांना लस देण्यात येत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

एका दिवसातील स्थिती२७ जानेवारी रोजी १०० जणांचे नियोजन असलेल्या क्रांतिचौक अंतर्गत केंद्रावर १३५ जणांचे लसीकरण झाले, तर अन्य एका केंद्रावर २०१ जणांना डोस देण्यात आला. महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.नीता पाडळकर म्हणाल्या, लसीकरणाच्या पोर्टलवर नोंदणी केलेले आरोग्य कर्मचारी आले नाही, तर इतर कर्मचाऱ्यांना लस देता येत आहेत. त्यासाठी आता ऑन द स्पॉट अ‍ॅलोकेशनला मंजुरी मिळाली आहे.

नवीन सुविधाचार दिवसांपूर्वी ‘अ‍ॅड बेनिफिशरी’ अशी सुविधा (ऑप्शन) मिळाली आहे. नियोजनातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर पुढील दिवसांतील कर्मचाऱ्यांनाही डोस देणे शक्य झाले आहे. कर्मचारी तयार असेल, तर त्यांना लवकर लस देता येत आहे. प्रत्येक कर्मचारी अर्धा तास निगराणीत थांबतात.- डॉ.सुधाकर शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद