व्यंकटेश वैष्णव , बीडयेथील तहसील कार्यालयाकडे जर तुमच्या जमीनीचे अथवा इतर महत्वाचे कागदपत्र असतील तर ती सुरक्षीत असतील किंवा तुम्हाला हवी तेव्हा मिळतील याची शक्यता नाही. कारण याचा प्रत्यय मागील सहा महिन्यापासून बीड तहसील कार्यालयात येत आहे. कार्यालयाकडील जात प्रमाणपत्राच्या मुळ संचयिका शोधूनही सापडत नसल्याने मागील तीन-चार वर्षात वाटप करण्यात आलेले जात प्रमाणपत्राच्या पारदर्शक कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संचिका गायब होण्याच्या प्रकारामुळे तहसील कार्यलयातील कारभारा विषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जात पडताळणीसाठी औरंगाबाद कार्यालयांकडून संबंधीत जात प्रमाणपत्राच्या संचिकाबाबत विचारले जाते. जातपडताळणी कार्यालयाकडून विचारलेल्या मुळ संचिका बाबत बीड तहसील कार्यालयाचे उत्तर ठरलेलेच आहे. एवढेच नाही तर तहसील कार्यालयाच्या संगणकात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर ठरलेले आहे. ‘सदरील जात प्रमाणपत्राची मुळ संचिका आढळून येत नाही’ असे दोन ओळीचे पत्र औरंगाबाद येथील जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाला सर्रास दिले जात आहेत.
जातप्रमाणपत्राच्या शेकडो संचिका तहसीलमधून गायब
By admin | Updated: August 7, 2015 01:15 IST