शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
5
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
6
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
7
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
8
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
9
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
10
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
11
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
12
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
13
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
14
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
16
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
17
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
18
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
19
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
20
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली

आयआयटीमध्ये यंदा औरंगाबादचे शंभर विद्यार्थी

By admin | Updated: June 20, 2014 01:11 IST

औरंगाबाद : आयआयटीमध्ये प्रवेशाची दारे खुली करणाऱ्या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा गुरुवारी निकाल जाहीर झाला.

औरंगाबाद : आयआयटीमध्ये प्रवेशाची दारे खुली करणाऱ्या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा गुरुवारी निकाल जाहीर झाला. या परीक्षेत औरंगाबादेतील सुमारे १०० विद्यार्थी यशस्वी झाले असून, देशभरातील वेगवेगळ्या आयआयटी संस्थांमध्ये त्यांना प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे शिक्षण देणाऱ्या देशभरातील आयआयटी संस्थांमध्ये प्रथम वर्षाच्या सुमारे १८ हजार जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी दरवर्षी अखिल भारतीय स्तरावर जेईई परीक्षा घेतली जाते. या वर्षी ती गेल्या मे महिन्यात झाली. नाथ व्हॅली स्कूलचा अमेय राजगोपाल लोया याने आॅल इंडियातून १७० वा रँक मिळवला आहे. त्याला बारावीत ९३ टक्के गुण होते. या यशाबद्दल अमेयने सदर प्रतिनिधीला सांगितले की, जेईईची तयारी करण्यासाठी कोटा येथे गेलो होतो. रोज ४ ते ५ तास कोचिंग आणि नंतर ९ ते १० तास सेल्फ स्टडी. यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्लॅनिंग आणि हार्डवर्क करणे आवश्यक आहे. तसेच अभ्यास करताना सर्व टॉपिकला समान महत्त्व द्यावे. नियमित सराव करावा, असेही तो म्हणाला. छत्रपती कॉलेजचा अक्षय मनोज दुसाद याने जेईई अ‍ॅडव्हान्समध्ये अखिल भारतीय स्तरावर ११३४ वा क्रमांक पटकावला. याच महाविद्यालयाचा अर्पित शिवशंकर स्वामी याने ओबीसी प्रवर्गातून मेरिट लिस्टमध्ये ६०६ वा रँक पटकावला. देवगिरी महाविद्यालयाची नेहा मनोज मुथियान हिने आॅल इंडियातून ३०१० वा क्रमांक मिळविला. तिने जेईईची तयारी राजस्थानमधील कोटा येथे केली. आपल्या यशाचे श्रेय तिने आई-वडिलांना दिले आहे. कन्नड येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा विद्यार्थी पुष्करराज महेंद्र ढाके याने ओबीसी प्रवर्गातून ४९ वा क्रमांक मिळवला आहे. या विद्यार्थ्यांना २० ते २४ जूनदरम्यान आॅनलाईन पसंती फॉर्म भरून आयआयटी संस्थांमधील प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.