शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकी : सोसायटीतील नागरिकांच्या मदतीमुळेच कोरोनाला हरवणे सोपे गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 19:39 IST

कोरोनामुक्त झालेल्या शिक्षिकेने व्यक्त केली भावना 

ठळक मुद्देसोसायटीतील दोन चिमुकले आणि पतीला १८ दिवस दिला नाश्ता, जेवण सोसायटीतील नागरिक जिवाभावाचे ठरले

- राम शिनगारे 

औरंगाबाद : कोरोनाची बाधा झालेल्या कुटुंबातील व्यक्तींवर समाजात बहिष्कार टाकण्याच्या घटना समोर येत आहेत. दवाखान्यात सेवा देतात म्हणून परिचारिकेच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न समाजकंटकांनी केला. मात्र, सातारा परिसरातील स्काय सिटी या सोसायटीमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या कुटुंबाच्या पाठीशी अख्खी सोसायटी उभी राहिली. या मानसिक आधारामुळेच या जीवघेण्या आजारावर मात करून सुखरूपपणे घरी आले असल्याची भावना जि.प.च्या शाळेतील शिक्षिका स्नेहल किरण शिर्के यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

सगळीकडे कोरोनाची साथ सुरू होती. अचानक थोडासा ताप आला. आम्ही जवळच्या हॉस्पिटलला गेलो, तर त्यांनी तपासणी केली नाही. तेथून एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलो. त्याठिकाणी तपासण्या केल्या तेव्हा  न्यूमोनिया असेल, असे सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी  कोविड-१९ ची तपासणी करण्यासाठी स्वॅब घेतला. हा स्वॅब सायंकाळी पॉझिटिव्ह आल्याचे समजताच आम्ही नवरा- बायको हादरून गेलो.  कारण आम्हाला एक वर्षाची मुलगी आणि पाच वर्षांचा मुलगा आहे. नवऱ्यासह दोन मुलांनाही कोरोनाचा संसर्ग झाला असेल असे वाटले; पण सुदैवाने तिघांचाही अहवाल निगेटिव्ह आला. मी दवाखान्यात उपचार घेत असताना दोन मुलांचे काय होणार? असा प्रश्न सतत मनात येत होता; पण सोसायटीतील लोक कुटुंबातील सदस्यांसारखे धावून आले. त्यांनी प्रत्येकांनी एक-एक दिवसाची जबाबदारी घेऊन सकाळी दूध, नाश्ता, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण घरपोच दिले.  त्यामुळे माझ्या मनावरचा भार हलका झाला आणि कोरोनाला हरविण्याचे बळ मिळाले. त्यांचे  ऋण आम्ही कधीच विसरू शकणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

कोरोनावर निश्चित मात करता येतेकोरोनावर मात करून घरी आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विलगीकरण करून घेतले आहे. या काळात महापालिका प्रशासन, पोलीस यांच्यासह सोसायटीतील नागरिक आणि बिल्डर यांनी मोलाचे सहकार्य केले. या सहकार्यामुळेच कोरोनावर मात करता आली. तरीही प्रत्येकाने घरीच थांबले पाहिजे. या नियमाचे पालन केल्यास आपण निश्चितपणे सुरक्षित राहू शकतो, असेही  शिर्के म्हणाल्या. 

सोसायटीतील नागरिक जिवाभावाचे ठरलेकोरोना झालेल्या कुटुंबाची होणारी परवड आम्ही विविध माध्यमांतून वाचत आहोत, पाहत आहोत. हीच वेळ माझ्या कुटुंबावर आल्यानंतर स्काय सिटी ही आमची सोसायटी ज्याप्रमाणे आमच्या कुटुंबाच्या पाठीशी उभी  राहिली. त्यावर विश्वास बसत नाही. अशाच पद्धतीने प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णांच्या मदतीला नागरिक धावले तर कोरोनाचे संकट लवकरच आपण संपवू शकतो.-किरण शिर्के, कोरोनामुक्त शिक्षिकेचे पती

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद