शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

जुन्याच मार्गावर धावतात मानव विकासच्या बसेस

By admin | Updated: June 17, 2014 00:40 IST

हिंगोली : नवशैक्षणिक वर्षाची सुरूवात झाली असताना मानव विकास मिशनच्या बसेस मात्र जुन्याच मार्गाने धावतात. गतवर्षी शैक्षणिक वर्षाचा पहिला महिना गेल्यानंतर मार्गाचा तिढा सुटला होता.

हिंगोली : नवशैक्षणिक वर्षाची सुरूवात झाली असताना मानव विकास मिशनच्या बसेस मात्र जुन्याच मार्गाने धावतात. गतवर्षी शैक्षणिक वर्षाचा पहिला महिना गेल्यानंतर मार्गाचा तिढा सुटला होता. यंदाही तिच स्थिती असून आगाराकडून मार्गाबाबत पत्र पाठवूनही पहिल्या दिवशी मानव विकासच्या बसेसचे मार्ग पंचायत समितीकडून आलेले नव्हते. परिणामी जुन्याच मार्गावरून या बसेस धावत आहेत. मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. त्यानुषंगाने मुलींच्या शिक्षणाचा टक्का वाढण्यासाठी मानव विकास मिशनने बसेसची व्यवस्था केली आहे. घरापासून शाळेपर्यंत आणि शाळेपासून घरापर्यंत मुलींच्या येण्या-जाण्याची व्यवस्था केली आहे. त्यातून दुर्गम भागातील मुलींना शाळेत जात येईल, हा त्यामागचा प्रमूख उद्देश आहे. म्हणून राज्यभरात मानव विकास मिशनच्या बसेस धावत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील तीन तालुक्यात मिळून १५ बसेस धावतात. प्रतिवर्षी या बसेसचा मार्ग पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून निश्चित करण्यात येतो. त्याआधी बीडीओ तिन्ही तालुक्यातील मुख्याध्यापकांकडून मुलींची पटसंख्या मागविली जाते. त्यानुसार बसेसचे मार्ग आखले जातात. नवमार्गासाठी हिंगोली आगाराकडून गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आले होते. त्यावर बीडीओंनी जुन्याच मार्गाचे बसेस सुरू ठेवण्याचे सांगितले. परिणामी हिंगोली आगाराने शाळेच्या पहिल्या दिवशी जुन्याच मार्गावर बसेस सोडल्या आहेत. जुन्या मार्गावर विद्यर्थिनीच्या संख्येबाबत आगार अनभिज्ञ आहे. सख्या वाढली तर फायदाच मात्र घटलेल्या संख्येच्या ठिकाणी बसेस धावत आहे. नवीन मार्गासाठी आणखी किती दिवसाचा कालावधी लागेल, याची निश्चिती नाही. बसेसचा मुलींना फायदामानव विकास मिशनच्या बसेसचा फायदा विद्यार्थिनींना होत आहे. बसेस धावणाऱ्या तिन्हीही तालुक्यातील मुलींनी बारावीच्या निकालात मुलांपेक्षा आघाडी घेतली. विशेषत: औंढा नागनाथ तालुक्यातील विद्यार्थिंनी जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ९६.१५ टक्के गुण मिळविले. औंढा तालुक्यातील पिंपळदरी, लोहरा, रामेश्वर आदी ठिकाणी या बसेस धावतात. एकूण पाच बसेस या तालुक्यासाठी आहेत. बसेसचे जूने मार्गहिंगोली- हिंगोली-खेर्डावाडी, हिंगोली-सिरसम-पातोंडा, सिरसम-खेर्डावाडी, हिंगोली-कनेरगाव-वाढोणा. औंढा नागनाथ- औंढा-पिंपळदरी, औंढा-माथा, औंढा-ब्रह्मवाडी, औंढा-रामेश्वर. सेनगाव- सेनगाव-पानकनेरगाव, सेनगाव-म्हाळशी, सेनगाव-जयपूर, गोरेगाव-केंद्रा बु, केंद्रा बु-जामठी, सेनगाव-साखरा. (प्रतिनिधी)