शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेब्लॉक घेऊन ‘समृद्धी’च्या उड्डाणपुलावर बसविले महाकाय गर्डर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 13:24 IST

समृद्धी महामार्गावरील लासूर स्टेशन रेल्वे उड्डाणपुलावर गर्डर बसविण्यात आले.

ठळक मुद्देया कामासाठी तीन तासांचा रेल्वेब्लॉक घेण्यात आलाएका गर्डरचे वजन आहे १३० मेट्रिक टन

औरंगाबाद : समृद्धी महामार्गावर लासूर स्टेशन येथे रेल्वे उड्डाणपुलाचे काम सध्या प्रगतिपथावर असून गेल्या दोन दिवसांत त्या ठिकाणी तीन तासांचा रेल्वेब्लॉक घेऊन महाकाय क्रेनच्या साहाय्याने १३० मेट्रिक टन वजनाचे चार मोठे गर्डर बसविण्यात आले आहेत.

माळीवाडापासून पुढे नाशिक जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत (गंगापूर, वैजापूर तालुक्यात) ‘एल अँड टी’ ही कंत्राटदार संस्था समृद्धी महामार्गाचे काम करत आहे. लॉकडाऊनमुळे अलीकडे दीड महिन्यांपासून समृद्धी महामार्गाच्या कामाला ब्रेक लागला आहे. मात्र, याही काळात स्वस्थ न बसता ‘एल अँड टी’ या कंत्राटदार संस्थेने लासूर स्टेशनजवळ उभारण्यात येणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलावर मोठमोठे गर्डर बसविण्यासाठी ५०० व ७५० मेट्रिक टन वजन उचलण्याची क्षमता असलेले दोन क्रेन भाडेतत्त्वावर मागवले असून शुक्रवार व शनिवारी सलग दोन दिवस रेल्वे उड्डाणपुलावर ४ मोठे गर्डर बसविण्यात आले आहेत. एका गर्डरचे वजन हे १३० मेट्रिक टन असून ४५ मिटर लांबीचा आहे. येथील रेल्वे उड्डाणपुलावर असे एकूण ८ महाकाय गर्डर बसविण्यात येणार आहेत.

तीन तासांचा रेल्वे ब्लॉक घेण्यात आला महाकाय गर्डर उचलून ते पुलावर बसविणे हे जोखमीचे काम आहे. त्यासाठी लागणारे मोठे क्रेन साधारणपणे मुंबई, दिल्ली, हैदराबाद अशा शहरांमध्येच मिळतात. रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी तांत्रिक मनुष्यबळ अपुरे असल्यामुळे या कंत्राटदार संस्थेने क्रेनसोबत अशा कुशल मनुष्यबळही बाहेरून आणले आहे. तथापि, क्रेनच्या उपलब्धततेनुसार गर्डर बसविण्याची वेळ निश्चित करण्यात आली होती. शुक्रवार व शनिवारी या दोन दिवशी अतिशय कुशलतेने ४ गर्डर बसविण्यात आले. त्यासाठी तीन तासांचा रेल्वे ब्लॉक घेण्यात आला होता. त्यावेळी तेथे ‘एमएसआरडीसी’चे अधीक्षक अभियंता बी. पी. साळुंके, ‘एल अँड टी’चे प्रकल्प अधिकारी आर. श्रीनिवासन तसेच दक्षिण- मध्य रेल्वेचे नांदेड व सिकंदराबाद येथील अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAurangabadऔरंगाबाद