शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

कवली शिवारात आगडोंब; रब्बी पिकांसह गुरांचा चारा जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 18:20 IST

रब्बी पिकांसह गुरूंचा चारा जळाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान

ठळक मुद्देआगीच्या विळख्याने शेतातील पिके जळून खाक

सोयगाव : कवली शिवारात लागलेल्या आगीत चार एकरवरील शेतीतील पिक जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. आगीने होरपळल्याने ज्वारीचे उभे पिक नष्ट झाले. त्यासोबतच जनावरांसाठी गोळा करून ठेवलेला चारा सुद्धा जळून कोळसा झाल्याने शेतकऱ्याचे दुहेरी नुकसान झाले आहे. दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत आगीचे कारण कळू शकले नव्हते.

सोयगाव तालुक्यातील कवली शिवारात चिंधा साळवे यांचे गट क्र-५० येथे शेत आहे. गुरुवारी सकाळी त्यांच्या चार एकर शेतात अचानक आग लागली. एका गुराख्याने याची माहिती गावात दिली. त्यानंतर शेअजारी शेतकरी आणि ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी धाव घेतली. मात्र आग नियंत्रणा बाहेर जाऊन चार एकरवरील संपूर्ण क्षेत्रात पसरली.  यात ज्वारी आणि आदी रब्बीची पिके, गुरांसाठी गोळा करून ठेवलेला चारा जळून कोळसा झाला. घटनास्थळी सरपंच वसंत बनकर, पोलीस पाटील निवृत्ती केंडे आदींनी पाहणी केली. आग नियंत्रणात आणण्यासाठी सुमेध बनकर, आनंद साळवे, आलीम तडवी, आरिफ तडवी आदींनी प्रयत्न केले. शेतकरी चिंधा साळवे यांनी सोयगाव तहसील कार्यालयात लेखी निवेदनाद्वारे घटनेची माहिती दिली असून पंचनामा करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :fireआगAurangabadऔरंगाबादagricultureशेती