शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांच्या संपाचा ग्रामस्थांना मोठा फटका; शासनाने तोडगा काढण्याची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 16:48 IST

ग्रामस्थांना दाखले मिळत नसल्याने अडचण 

ठळक मुद्देविविध दाखले मिळत नसल्याने बेरोजगार युवकात अस्वस्थता

पैठण : ग्रामसेवक गेल्या १९ दिवसापासून संपावर गेल्याने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ग्रामसेवकांचा संप मिटविण्यासाठी शासन स्तरावर हालचाल झाली नसल्याने  ग्रामस्थात चिंतेचे वातावरण  निर्माण झाले आहे. पैठण तालुक्यातील १०७ ग्रामपंचायतीचे कामकाज बंद पडल्याने अडचणीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सध्या शासनाच्या विविध खात्यात नोकर भरती सुरू असून अर्ज करण्यासाठी लागणारे विविध दाखले मिळत नसल्याने बेरोजगार युवकात यामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे.

पंचायतराज व्यवस्थेत ग्रामपंचायतीस पाया तर ग्रामसेवकास कणा मानले गेले आहे . पैठण तालुक्यातील १०७ ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी दैनंदिन कामकाजाचे शिक्के व दप्तर गटविकास अधिकारी यांच्याकडे जमा करून दि २२ ऑगस्ट पासून संप पुकारला आहे, तेव्हापासून ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प आहे.पैठण तालुक्यात अनेक गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून टँकरचा प्रस्ताव पंचायत समिती कडे कसा दाखल करावा असा मोठा प्रश्न अनेक गावासमोर सध्या निर्माण झाला आहे. दुष्काळ परिस्थिती मुळे शासनाच्या विविध योजना सध्या घोषित करण्यात आल्या आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रमाणपत्र मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. बेरोजगारांना नोकरीसाठी लागणारे प्रमाणपत्र मिळत नसल्याने युवकात अस्वस्थता आहे. ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज ठप्प पडल्याने गावातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दैनदिन येणाऱ्या अडीअडचणी कोणाकडे सागाव्या असा मोठा प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

ग्रामसेवकांच्या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष सखाराम दिवटे, सागर डोईफोडे, जिजाभाऊ मिसाळ, रमेश आघाव, उपाध्यक्ष नेमाणे सुनिता, खंडु वीर, ईश्वर सोमवंशी, कायदा सल्लागार पंडित सांगळे, संघटक सीमा सोनवणे, महिला संघटक आशा तुपे, संगीता दानवे, सुहासिनी कळसकर,मनीषा क्षीरसागर, दशरथ खराद, सुहास पाटील, प्रशांत साळवे, सिध्दार्थ काकडे, आण्णासाहेब कोरडे , सोमनाथ खराडे, विनायक इंगोले, नितिन निवारे,राजू दिलवाले,बाबासाहेब तांबे कैलास गायकवाड़ तुळशिराम पोतदार,संजय शिंदे यांच्यासह तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक सहभागी आहेत.

काय आहेत ग्रामसेवकांच्या मागण्या....ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पद रद्द करण्यात येऊन पंचायत विकास अधिकारी पद निर्मिती करणे. ग्रामसेवक संवर्गास प्रवास भत्ता शासन नियमाप्रमाणे मंजूर करावा. ग्रामसेवकाची शैक्षणिक अर्हता पदवी करावी, लोकसंख्येवर आधारित सजे व पदे याच्यात वाढ करावी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी वेतन त्रुटी दूर करावी. सन २००५ नंतर रूजू झालेल्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व आदर्श ग्रामसेवक  पुरस्काराची आगाऊ वेतनवाढ द्यावी. ग्रामसेवका कडील अतिरिक्त कामाचा बोजा कमी करावा.   

मोठ्या गावांना फटका......ग्रामसेवकाच्या संपामुळे मोठी लोकसंख्या असलेल्या गावातील नागरी समस्या वाढल्या आहेत पैठण तालुक्यातील चितेगाव, लोहगाव, पाचोड , बिडकीन , विहामांडवा , आडूळ, नवगाव, बालानगर, चांगतपुरी, पिंपळवाडी, आदी मोठ्या गावातील ग्रामपंचायतींना ग्रामसेवकाच्या संपाची झळ बसली आहे .  

तोडगा निघावा ग्रामसेवकांच्या  आंंदोलनामुळे विकास कामाना खिळ बसली असून दैनंदिन अडचणीचा सामना करावा लागत आहे. शासनाने संपावर तोडगा काढून संप मिटवावा व ग्रामीण भागातील जनतेला दिलासा द्यावा.- जाबेर पठाण, सरपंच बालानगर.

शासनाने मागण्या मान्य कराव्यात शासनाच्या योजना ग्रामीण भागातील ग्रामस्थापर्यत पोहचवण्यासाठी आम्ही रात्रदिवस काम करतो, या व्यतिरिक्त शासनाने वेळोवेळी सोपवलेली कामेही आम्ही करतो. इतर विभागाच्या योजना राबविण्याची जबाबदारी ग्रामसेवकावरच सोपण्यात येते, सर्व करूनही आमच्या संवर्गाच्या रास्त मागण्या शासन मान्य करत नाही. आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत सुरूच ठेवण्यात येणार आहे. शासनाने पदाधिकारी, ग्रामस्थ यांची गैरसोय होऊ नये यासाठी आमच्या रास्त मागण्या मान्य कराव्यात.- सागर डोईफोडे, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना

टॅग्स :StrikeसंपAurangabadऔरंगाबादgram panchayatग्राम पंचायतStudentविद्यार्थी