औरंगाबाद : हडको परिसरातील वानखेडेनगरात एका महिलेचा गळा दाबून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. या महिलेचा दीर हा घराला बाहेरून कुलूप लावून गायब झालेला असल्याने संशय बळावला आहे. अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. रोहिणी शिवाजी सोनवणे (३५, रा. वानखेडेनगर), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, शिवाजी सोनवणे हे पत्नी रोहिणी, मुलगा जयेश (११), कार्तिक (२) आणि छोटा भाऊ रामेश्वर (२६) यांच्यासोबत वानखेडेनगरात किरायाच्या घरात राहतात. सोनवणे हे एका खाजगी कंपनीत नोकरीला आहेत. मंगळवारी नित्याप्रमाणे दुपारी ते ड्यूटीला निघून गेले. सायंकाळच्या वेळी रामेश्वरने आपल्या दोन्ही पुतण्यांना जवळच राहणाऱ्या नातेवाईकाकडे जा, असे सांगत घरातून बाहेर काढले. मुले घरातून बाहेर पडताच त्याने घराचा दरवाजा आतून बंद केला. आतमध्ये रोहिणी होती. काही वेळानंतर रामेश्वरही घरातून बाहेर पडला. जाताना त्याने घराला बाहेरून कुलूप लावले.
हडकोत महिलेचा गळा दाबून खून
By admin | Updated: April 16, 2015 01:01 IST