शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

प्लास्टिकशिवाय वस्तूंचे मार्केटिंग करावे कसे? महिला उद्योजकांना पडला प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 12:55 IST

घरगुती स्तरावर उद्योग करणाऱ्या अनेक महिला उद्योजक त्यांच्या उत्पादनांचे पॅकिंग पारदर्शक प्लास्टिकच्या पिशव्यांमध्येच करतात.

औरंगाबाद : घरगुती स्तरावर उद्योग करणाऱ्या अनेक महिला उद्योजक त्यांच्या उत्पादनांचे पॅकिंग पारदर्शक प्लास्टिकच्या पिशव्यांमध्येच करतात. या पारदर्शक पिशव्यांमधून आतील वस्तू स्पष्टपणे दिसत असल्यामुळे वस्तूंची गुणवत्ता लगेच कळते, त्यामुळे ग्राहकांचेही समाधान होते आणि ते चटकन त्या वस्तू विकत घेतात; पण आता मात्र प्लास्टिक पिशव्यांवरच बंदी येणार असेल, तर आमच्या वस्तूंचे मार्केटिंग करावे कसे आणि या वस्तू पॅक करण्यासाठी काय वापरावे, असा प्रश्न घरगुती स्तरावर व्यवसाय करणाऱ्या अनेक महिला उद्योजकांना पडला आहे.

राज्य शासनाने प्लास्टिकच्या ज्या वस्तूंवर बंदी घातली आहे, त्यामध्ये कॅरिबॅग आणि पॅकेजिंग बॅगचाही समावेश असल्यामुळे महिला उद्योजक विचारात पडल्या आहेत. सध्या उन्हाळ्यामुळे घरगुती स्तरावर तयार होणाऱ्या शेवया, पापड, लोणची, वाळवण या पदार्थांची विक्री तेजीत आहे. महिलांकडून किंवा बचत गटांकडून या वस्तू पारदर्शक प्लास्टिकच्या बॅगमध्ये आकर्षक रीतीने पॅक करून विविध दुकानांत विक्रीसाठी दिल्या जातात. चव घेऊन पाहण्यापेक्षा अनेकदा ग्राहक या वस्तू दिसायला कशा आहेत, हे पाहूनच पदार्थांची गुणवत्ता ठरवतो आणि विकत घेतो; पण आता पॅकेजिंग बॅगवर बंदी आल्यामुळे या वस्तू विविध दुकांनामध्ये विकायला ठेवायच्या कशा, याबाबत संभ्रम आहे.

कागदी बॅगमध्ये वस्तू पॅक केल्यामुळे ग्राहकांना आतील वस्तू नेमकी कोणत्या दर्जाची आहे हे समजत नाही आणि प्रत्येक वेळी ग्राहकासमोरच सर्व गोष्टी पॅक करून देणे उद्योजकांना अडचणीचे ठरते. तूप, दही, धूप, उदबत्ती, विविध मसाले, चटण्या, सरबते, जॅम, जेली, विविध प्रकारचे पीठ, कलाकुसरीच्या वस्तू अशा सर्वच वस्तू तयार करणाऱ्या उद्योजकांपुढे प्लास्टिकअभावी पॅकिंगचा प्रश्न उभा आहे. 

पुनर्प्रक्रिया होणाऱ्या बॅगची निर्मिती करावीस्वत:च्या उत्पादनांसाठी ज्यांच्याकडे दुकाने आहेत, असे उद्योजक प्लास्टिकशिवाय त्यांच्या वस्तू पॅक करू शकतात. त्यांना प्लास्टिकवर बंदी घातल्याने मोठी अडचण येणार नाही; पण आम्हाला आमचे उत्पादन अनेक दुकानांमध्ये विक्र्रीसाठी द्यावे लागते. 

काम कसे करावे हा प्रश्न अनेकजणी प्रदर्शनांमध्येही त्यांचे उत्पादन ठेवतात. आता प्लास्टिकबंदीमुळे हे काम कसे करावे, असा प्रश्न पडला आहे. यासाठी पुनप्रक्रिया होऊ शकणाऱ्या पारदर्शक प्लास्टिक बॅगची निर्मिती होणे आवश्यक वाटते. - कुमुदिनी जाहगीरदार

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीWomenमहिलाbusinessव्यवसायMarketबाजार