शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
2
सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
3
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
4
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
5
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
6
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
7
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
8
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
9
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
10
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
11
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
12
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर
13
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
14
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
15
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
16
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
17
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
18
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
19
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
20
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले

'तुमची किती लफडी आहेत?, संजय शिरसाटांना गोव्याचा नाद'; ठाकरे गटाचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 14:40 IST

संजय शिरसाट यांनी टाकरे गटावर केलेल्या टिकेला विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

छत्रपती संभाजीनगर -  शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर पातळी सोडून टीका करताना पाहायला मिळत आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेतील एका सभेत भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. त्याला, शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले होते. आता, संजय शिरसाट यांच्या टीकेचा समाचार ठाकरे गटातील प्रमुख नेत्यांनी घेतलाय. 

संजय शिरसाट यांनी टाकरे गटावर केलेल्या टिकेला विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर दिलंय. संजय शिरसाट हे काहीही बरळतात. त्यांना मंत्रीपद न मिळाल्याने ते असं काहीही बोलतात. मी कशाला शिरसाट यांना फोन करू, असे अंबादास दानवे यांनी म्हटले. तर, सुषमा अंधारेंवर केलेल्या टीकेवरुन चंद्रकांत खैरे यांनी संजय शिरसाट यांना जुगाराची नाद असल्याचं, नक्कल करुन सांगितलं. तुमची किती लफडी आहेत, काढले तर खूप लफडे येतील. आता, गोव्याला हारुन आलेत हे.. असे म्हणत खैरे यांनी हातावर हात मारत जुगारीची नक्कल करुन दाखवली. तर, स्त्रीयांवर अशा प्रकारची वक्तव्य करणं चुकीचं आहे. यापूर्वी अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबद्दल अशीच खालच्या भाषेत टीका केली होती. आता, शिरसाट यांनीही तेच केलय. या नेत्यांमध्ये स्त्रियांचा अवमान करण्याची स्पर्धाच लागलीय, पण हे योग्य नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असे म्हणत दानवे यांनीही शिरसाट यांच्यावर पलटवार केलाय. 

काय म्हणाले होते संजय शिरसाट

ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. पण तिने काय-काय लफडी केली आहे, हे तिलाच माहिती, अशी टीका करताना संजय शिरसाट यांची जीभ घसरली. तर, अरे पण तू आहे तरी कोण? आम्ही आमची ३८ वर्षे शिवसेनेसाठी घालवली. आता तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करताय आणि काही उरलेले लोक टाळ्या वाजवत आहेत, अशा शब्दांत संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारेंवर सडकून टीका केली होती.

मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक

स्वप्न पहा, शिरसाट यांची बडबड कोणी ऐकत नाही. आमदार संजय शिरसाट यांची बडबड आजकाल कोणीही ऐकत नाही. ते बडबड करीत असतात.त्यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही. मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. मी शिंदे गटात यावे,असे त्यांचे स्वप्न असेल तर ते त्यांनी पहावे. - आ. अंबादास दानवे, विधानपरिषद विरोधीपक्षनेते 

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेSanjay Shirsatसंजय शिरसाटShiv SenaशिवसेनाAmbadas Danweyअंबादास दानवेChandrakant Khaireचंद्रकांत खैरे