शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

हर्सूल जेलमधील कैदी उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये आलेच कसे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 19:09 IST

कारागृह प्रशासनाने सर्व पॉझिटिव्ह कैद्यांना दोन दिवसांपूर्वी कोविड सेंटर येथे आणून सोडले.

ठळक मुद्देमहापालिकेचा कोविड सेंटरमध्ये उपचार देण्यास होता विरोध दोन कैदी पळाल्याचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे.

औरंगाबाद : हर्सूल कारागृहातील तब्बल २९ कैदी किलेअर्क येथील कोविड सेंटरला आणण्यास महापालिकेने दोन दिवसांपूर्वीच विरोध दर्शविला होता. कारागृहात ठेवूनच पॉझिटिव्ह कैद्यांवर औषधोपचार करण्याचा पर्याय महापालिकेने कारागृह प्रशासनासमोर ठेवला होता. यानंतरही मोठी जोखीम घेऊन कैदी कोविड सेंटरला कोणी आणले, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. 

अक्रम खान आणि सय्यद सैफ हे दोन कैदी पळाल्याचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. हर्सूल कारागृहातील तब्बल ११० कैद्यांची तपासणी तीन दिवसांपूर्वी करण्यात आली होती. त्यातील २९ कैदी पॉझिटिव्ह असल्याचे उघडकीस आले होते.  सर्व कैद्यांना किलेअर्क येथील मनपाच्या कोविड सेंटरमध्ये आणून ठेवणे म्हणजे मोठी जोखीम होती. मनपाने कारागृहाच्या प्रशासनासमोर जागेवरच औषधोपचार करण्यासाठी सर्व यंत्रणा उभी करण्याचे आश्वासन दिले होते, अशी मनपाकडून मिळाली. कारागृह प्रशासनाने सर्व पॉझिटिव्ह कैद्यांना दोन दिवसांपूर्वी कोविड सेंटर येथे आणून सोडले. या सेंटरमधील दुसऱ्या मजल्यावर वेगवेगळ्या कक्षांमध्ये कैद्यांना ठेवून त्यांच्या रूमला कुलूप लावण्यात आले होते. कैदी पळून जाऊ नयेत म्हणून कारागृह प्रशासनाने वेगवेगळ्या शिफ्टमध्ये प्रत्येकी सहा कर्मचारी नेमले होते. रविवारी रात्री नाईट शिफ्टमध्ये असलेले सर्व सहा कर्मचारी कोविड सेंटरच्या दर्शनी भागात उपस्थित होते. तरीही दोन कैदी पसार झाले. 

आमची टीम गेली होतीहर्सूल कारागृहात २९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर आमच्या डॉक्टरांची एक टीम कारागृहात गेली होती. त्यांनी कारागृह प्रशासनासोबत चर्चा केली. प्रशासनानेच सर्व पॉझिटिव्ह रुग्ण कोविड सेंटरला पाठवण्याचा निर्णय घेतला.- नीता पाडळकर, आरोग्य अधिकारी, मनपा 

coronavirus : धक्कादायक ! घाटीतून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाला

जेलला कोविड सेंटर घोषित करणे योग्य ठरणार नाहीकारागृहातील कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी किलेअर्क येथील कोविड सेंटरला तात्पुरते जेल म्हणून घोषित केले आणि त्यानंतर कैद्यांना तेथे हलविण्यात आले. महापालिका आज पत्र पाठवून आणि व्हॉटस्अ‍ॅपवर मेसेज करून कैद्यांना जेलमध्ये परत घेऊन जा,  आम्ही तेथेच कोविड सेंटर जाहीर करून उपचार करतो, असे सांगत आहे. मात्र, कारागृहातील कैद्यांची संख्या विचारात घेऊन जेलला कोविड सेंटर घोषित करणे योग्य ठरणार नाही. - हिरालाल जाधव,  हर्सूल कारागृह अधीक्षक 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद