शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

मध्यरात्री १ वाजेपर्यंत चालणार हॉटेल्स अन् बार...

By admin | Updated: December 28, 2015 23:24 IST

राजकुमार जोंधळे , लातूर जिल्ह्यात नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरनिमित्त करण्यात येणाऱ्या ओल्या पार्ट्या, अनियंत्रित मद्यप्राशन करणाऱ्या तरुणाईवर पोलिस प्रशासनासह

राजकुमार जोंधळे , लातूरजिल्ह्यात नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरनिमित्त करण्यात येणाऱ्या ओल्या पार्ट्या, अनियंत्रित मद्यप्राशन करणाऱ्या तरुणाईवर पोलिस प्रशासनासह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांची करडी नजर राहणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने ६९ हजार एकदिवसीय मद्यसेवन परवाने उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात १२० पोलिस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तावर आहेत.अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपलेल्या नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक हॉटेल्स, परिमिटरुम, बार आणि धाबे सजली आहेत. नववर्षाच्या स्वागताची पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. ३१ डिसेंबर रोजी १८ वर्षापेक्षा ज्यांचे वय अधिक आहे, अशांना एकदिवसीय मद्यसेवन परवाने देण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. बेकायदेशीर मद्याचे सेवन करु नये, यासाठी पथकांमार्फत तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यातील उदगीर, जळकोट, अहमदपूर आणि रेणापूर तालुक्यांच्या सीमेवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विशेष लक्ष राहणार आहे. या परिसरात परजिल्हा, परराज्यातून येणारी देशी-विदेशी दारु यावर पायबंद घालण्यासाठी या विभागाच्यावतीने नांदेड-लातूर जिल्ह्याचे संयुक्त पथक आणि एक भरारी पथक कार्यरत राहणार आहे. बेकायदा, बनावट आणि अयोग्य मद्य विक्री करणाऱ्यांवर छापे टाकत कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक केशव राउत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.