शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

लग्नासाठी परवानगी घेताना यजमानांची फरपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:25 IST

औरंगाबाद : ५० वऱ्हाडींच्या साक्षीने लग्न लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यासाठी प्रथम मंगल कार्यालयाचे अर्ज, ...

औरंगाबाद : ५० वऱ्हाडींच्या साक्षीने लग्न लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यासाठी प्रथम मंगल कार्यालयाचे अर्ज, नंतर महानगरपालिकेची परवानगी व त्यानंतर पोलीस विभागाची परवानगी घ्यावी लागत आहे. या प्रशासकीय परवानग्या मिळविताना वर,वधू पित्यांची दमछाक होत आहे. यामुळे ‘लग्न बघावे करून’ या म्हणीची प्रचिती येत आहे.

लग्न समारंभासाठी बुकिंग केलेल्या मंगल कार्यालयाचा अर्ज घेऊन महापालिकेच्या झोनल अधिकाऱ्यांकडे जावे लागते. तिथे वधू- वर यांचा जन्माचा दाखला किंवा टीसी द्यावी लागते. सोबत आधारकार्ड, रहिवासी पुरावा जोडावा लागतो व मनपाचा अर्ज भरून द्यावा लागतो.

महानगरपालिकेची परवानगी मिळाल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यात अर्ज करावा लागतो. तिथेही मनपात दिलेली सर्व कागदपत्रे जोडावी लागतात. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वर,वधू येणार असतील त्या पोलीस ठाण्याचीही ना हरकत घ्यावी लागते.पोलीस ठाण्याची ना हरकत घेऊन पोलीस आयुक्त कार्यालयात जावे लागते. पुढे आयुक्तालयाच्या विशेष शाखेतून परवानगी देण्यात येते. लग्नाचे तयारीत व्यस्त असणाऱ्या वधू-वराच्या कुटुंबीयांना या सर्व प्रक्रियेतून जाताना अक्षरश: दमछाक होत आहे. कारण लग्नाच्या तयारीपेक्षा परवानगीसाठी जास्त वेळ जात असल्याचे काही वधू व वर पित्यांनी सांगितले. लग्नाच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना लागू करावी अशी मागणी केली जात आहे. शहरात शेकडो लोकांच्या उपस्थितीत दररोज होणारे राजकीय समारंभ ,आंदोलने या पार्श्वभूमीवर लग्नासाठीच जास्त अटी असल्याचेही काहींचे म्हणणे आहे.

चौकट

१.लग्न समारंभासाठी विशेष बाब म्हणून परवानगी

२. राज्यात प्रवासासाठी पास बंद करण्यात आले असले तरी परवानगीमध्ये बाहेरगावाहून येणाऱ्यांसाठी

प्रवास परवाना व कोविड नसल्याच्या प्रमाणपत्राची अट

३. महापालिकेकडून ५० तर पोलिसांकडून ४५ व्यक्तींना समारंभात उपस्थितीची परवानगी.

४. याचा भंग करणाऱ्या व्यक्ती, संस्था व समूहाविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा व आमपीसी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

५. परवानगीसाठी एक खिडकी योजना अंमलात आणण्याची मागणी.