औरंगाबाद : राज्यातील पाणीटंचाई भीषण स्वरूप धारण करीत आहे. या बिकट परिस्थितीत पाण्याची बचत आणि त्याच्या पुनर्वापरासाठी ‘लोकमत’ने राज्यभर जलमित्र अभियान हाती घेतले आहे. या अभियानात शहरातील रुग्णालयांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत पाणी बचतीसाठी पुढाकार घेतलाआहे. महाराष्ट्र आणि देशातील बहुतांश भागांमध्ये जलसंकट ओढवले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी ‘लोकमत’ने ‘जलमित्र अभियान’ हाती घेतले आहे. या अभियानात शहरातील रुग्णालयांनी मोठ्या संख्येने सहभागी होत पाणी बचतीचा निर्धार केला आहे. सध्याच्या जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये जाऊन जनजागृती करण्यात आली. त्यामुळे रुग्णालयांच्या माध्यमातूनही सर्वसामान्यांपर्यंत पाणी बचतीचा संदेश पोहोचविला जात आहे. यातूनच पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी हातभार लागणार आहे.शहरातील विविध रुग्णालयांत प्रवेश करताना दर्शनी भागामध्ये लावण्यात आलेले ‘लोकमत जलमित्र अभियान’चे फलक, पोस्टर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. या फलक, पोस्टर्सवर पाणी बचतीविषयी विविध संदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती हे संदेश वाचल्याशिवाय राहत नाही.तसेच वॉशरूममध्ये पाण्याच्या वापर अधिक होतो. त्यामुळे या ठिकाणीही पाणी बचत करण्यासंदर्भात जनजागृती क रणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक जण पाणी बचत करण्यासाठी प्रवृत्त होत आहे.
पाणी बचतीसाठी रुग्णालयांचाही पुढाकार
By admin | Updated: May 18, 2016 00:11 IST