शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दवाखान्याचे टेन्शन मिटले; राशन कार्ड कोणतेही असो आता ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत!

By विजय सरवदे | Updated: July 11, 2023 19:23 IST

सर्वच शिधापत्रिकाधारक नागरिकांना मिळणार उपचाराचा लाभ

छत्रपती संभाजीनगर : महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचारासाठी मिळणाऱ्या आर्थिक मदतीची रक्कम पाच लाखांपर्यंत वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, या योजनेचा लाभ आता सरसकट सर्वांनाच मिळणार आहे. राज्यातील केशरी व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांपुरती मर्यादित असलेली ही योजना आता राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक नागरिकांना लागू झाली आहे.

महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि केंद्र सरकारच्या पंतप्रधान जन आरोग्य योजनांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या दोन योजनांच्या एकत्रीकरणामुळे पूर्वी मिळणारे दीड लाखांचे आरोग्य कवच यापुढे पाच लाखांचे मिळणार आहे. एवढेच नाही, तर उपचारांसाठी रुग्णालयांची संख्याही वाढविण्यात आली आहे.

काय आहे महात्मा फुले जनआरोग्य योजना?गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना दर्जेदार आणि मोफत वैद्यकीय सेवा देण्यासाठी ही योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील नागरिकांना पाच लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळणार आहेत.

केशरी, अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनाच मिळायचा लाभपूर्वी अन्नपूर्णा योजना, दारिद्र्यरेषेखालील पिवळे, अंत्योदय अन्न योजना रेशनकार्ड आणि दारिद्र्यरेषेवरील केशरी रेशनकार्ड तसेच ज्या कुटुंबाचे वार्षिक एक लाख उत्पन्न आहे, अशाच नागरिकांना या योजनेचा लाभ मिळायचा. आता ती अट काढून टाकण्यात आली आहे.

प्रत्येक कुटुंबावर पाच लाखांपर्यंत उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेला पंतप्रधान जन आरोग्य योजनेची जोड देऊन फक्त पिवळे व केशरी कार्डधारकांनाच नव्हे, तर सर्व रेशनकार्ड धारकांना वैद्यकीय उपचारासाठी पाच लाखांचे आरोग्यसेवा कवच देण्यात येणार आहे.

या ३४ खासगी रुग्णालयांत मिळतील उपचारजिल्ह्यातील ॲपल हॉस्पिटल, एशियन सिटीकेअर सुपरस्पेशालिटी, औरंगाबाद इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, अल्पाइन सुपरस्पेशालिटी, सेच्युरी मल्टीस्पेशालिटी, डॉ. हेडगेवार, डॉ. रुणवाल हृदयम हार्ट केअर सेंटर, दृष्टी आय इन्स्टिट्यूट, डॉ. दहिफळे मल्टीस्पेशालिटी, गणपती आयसीयू अँड मल्टीस्पेशालिटी, आयकॉन मल्टीस्पेशालिटी, इंटरनॅशनल हॉस्पिटल, जे. जे. प्लस, जिल्हा प्लस हॉस्पिटल, कृपामयी हॉस्पिटल, लघाने मल्टीस्पेशालिटी, लाइफलाइन मल्टीस्पेशालिटी, महात्मा गांधी मिशन हॉस्पिटल, एमआयटी हॉस्पिटल, कमलनयन बजाज, माणिक हॉस्पिटल, माऊली हाॅस्पिटल, निमाई चिल्ड्रन हॉस्पिटल, सावजी मल्टीस्पेशालिटी, एडीएच १०० वैजापूर, धूत हॉस्पिटल, साई हॉस्पिटल पैठण, शिवा क्रिटिकल केअर, सिनर्जी हॉस्पिटल, युनायटेड सिग्मा, उत्कर्ष हॉस्पिटल, वाळूज हॉस्पिटल, आनंद चॅरिटेबल ट्रस्टचे आनंद हॉस्पिटल, आदींसह शासकीय वैद्यकीय रुगणालय, घाटी, शासकीय कर्करोग रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयात या योजनेंतर्गत उपचार घेता येतील.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटल