शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

‘रूही’तून मिळणार हॉरर कॉमेडीची ट्रीट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:02 IST

- अबोली शेलदरकर कुलकर्णी क्वीन, सिटी लाइट्स, ट्रॅप्ड, न्यूटन अशा हर तऱ्हेच्या चित्रपटात काम करणारा हरहुन्नरी अभिनेता म्हणजेच राजकुमार ...

- अबोली शेलदरकर कुलकर्णी

क्वीन, सिटी लाइट्स, ट्रॅप्ड, न्यूटन अशा हर तऱ्हेच्या चित्रपटात काम करणारा हरहुन्नरी अभिनेता म्हणजेच राजकुमार राव. रोमँटिक, बायोपिक, कॉमेडी, हॉरर अशा अभिनयाच्या प्रत्येक वाटेवर चालणारा हा अष्टपैलू अभिनेता. ११ मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘रूही’ चित्रपटातून राजकुमार राव प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्ताने त्याच्याशी केलेले हितगुज...

१. ‘रूही’ चित्रपटात तुझी भूमिका कशी आहे?

- या चित्रपटात मी भवरा हे पात्र साकारतोय. भवरा हा रूहीच्या प्रेमात पडतो. मात्र, रूही हिच्यात एक चेटकीण देखील असते. कहाणी पुढे सरकत असताना भवरा कसा घटनांमध्ये अडकत जातो आणि त्यातून तो कसा बाहेर पडतो, हे सर्व पडद्यावर पाहणेच प्रेक्षकांना धम्माल अनुभव देणारे आहे.

२. ‘रूही’च्या कथानकात अशी कोणती गोष्ट आहे जिने तुला प्रभावित केले?

- रूही हा चित्रपट एक हॉरर कॉमेडी आहे. यापूर्वी मी स्त्री हा हॉरर कॉमेडी चित्रपट केला होता. स्त्री चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे या चित्रपटाची ऑफर येताच मी ती स्वीकारली. मला हॉरर कॉमेडी या प्रकारच्या चित्रपटात काम करायला खूप आवडतं.

३. वरूण आणि जान्हवीसोबत सेटवर वातावरण कसे होते?

- सेटवर आम्हा सर्वांमध्ये खूप मस्ती, धम्माल चालायची. वरूण आणि जान्हवी दोघेही माझे खूप चांगले मित्र आहेत तसेच उत्कृष्ट कलाकार आहेत. आम्ही सर्वांनी चित्रपटावर खूप मेहनत घेतली आहे.

४. ‘स्त्री’नंतर पुन्हा एकदा हॉरर कॉमेडी...काय वाटते प्रेक्षकांच्या प्रतिसादाबाबत?

- आम्ही खूप उत्सुक आहोत. आम्हाला वाटते की, प्रेक्षकही चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असतील. थिएटरमध्ये जाताना फक्त मास्क घालून जा आणि ती धम्माल अनुभवा.

५. दिग्दर्शक हार्दिक मेहता यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता ?

- क्वीन, टॅप्ड चित्रपटांपासून मी हार्दिक यांना ओळखतो. ते माझे चांगले मित्र आहेत. कोणत्याही प्रोजेक्टवर ते खूप मेहनत घेतात. त्यांच्याकडून बरंच शिकायलाही मिळतं.

................................................

पूजा सावंत दिसतेय स्टनिंग

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात अभिनेत्री पूजा सावंतने वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येसुद्धा आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. सध्या ती एका डान्स शोमध्ये परीक्षक आहे. यासोबतच ती सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. तिने नुकतेच एक फोटोशूट शेअर केले आहे. लाल रंगाच्या ड्रेसमधील या फोटोशूटने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या वेगळ्या अंदाजातील ड्रेसमध्ये पूजा स्टनिंग दिसतेय. या फोटोंमधील तिच्या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच आहेत.

..................

नॅशनल क्रश करणार बॉलिवूडमध्ये एंट्री

दाक्षिणात्य सिने इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी रश्मिका मंदाना ‘मिशन मजनू’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. रश्मिकाने सिद्धार्थ मल्होत्रासोबत लखनऊमध्ये या थ्रिलर चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. जेव्हापासून या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हापासून हा चित्रपट चर्चेत आला आहे. या चित्रपटात १९७० सालच्या पाकिस्तानमधील भारताच्या धाडसी मोहिमेची कथा आहे, ज्याने दोन्ही देशांमधील संबंध कायमचे बदलले. दाक्षिणात्य सिने इंडस्ट्रीत उल्लेखनीय आणि अविस्मरणीय भूमिका केल्यानंतर आता रश्मिकाच्या बॉलिवूड पदार्पणावर सगळ्यांचे लक्ष आहे.