शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

आष्टीत मोर्चा; मांजरसुंब्यात रास्ता रोको

By admin | Updated: July 18, 2016 01:09 IST

बीड : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीची बलात्कार करुन हत्या केल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद रविवारी जिल्ह्यात उमटले.

बीड : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीची बलात्कार करुन हत्या केल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद रविवारी जिल्ह्यात उमटले. तालुक्यातील मांजरसुंबा येथे रास्ता रोको तर आष्टीत मूक मोर्चाद्वारे नागरिकांनी निषेध नोंदवला. दरम्यान, सोमवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.मांजरसुंबा येथे धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी स्वप्नील गलधर, डॉ. गणेश ढवळे, मनोज जरांगे, हनुमान मुळीक, दीपक जगदाळे, ऋषीकेश सुरवसे, नाना महाराज कदम आदी उपस्थित होते. पीडित मुलीच्या कुटुबियांचे पुनर्वसन करावे, आरोपींवर कठोर शासन करावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली. तासभर वाहतूक विस्कळीत झाली होती.आष्टी येथे छत्रपती कॉम्पलेक्स परिसरात विविध सामाजिक संघटनांची सकाळी बैठक झाली. त्यानंतर दुपारी काळ्या फिती लावून पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढण्यात आला. शिवाजी महाराज संकूल, साठे चौक, कमान वेस, डॉ. आंबेडकर चौक मार्गे मोर्चा ठाण्यात पोहोचला. यावेळी निरीक्षक एच. जी. गवळी यांना निवेदन देण्यात आले. रमजान तांबोळी, संजय मेहेर, महेश शिंदे, डॉ. जालिंदर वांढरे, सागर तेरकर, संदीप खाकाळ, हिरालाल बलदोटा, बा.म. पवार, कल्याण तळेकर, संजय पवार, गणेश काकडे, श्रीपाद बळे, अनिल जगदाळे, राहुल मुथा, बाळासाहेब थोरवे, यदू शहाणे, दिलीप ुसुरवसे, अंकुश खोटे, मुकुंद लगड यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.अंबाजोगाईत सामाजिक संघटनांनी निषेध नोंदविला. सोमवारी व्यापारपेठ, शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय निषेध बैठकीत झाला.बीडमध्ये विश्रामगृहात संघटनांचे पदाधिकारी एकवटले. बैठकीत घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. सोमवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. यावेळी अशोक हिंगे, प्रा. सचिन उबाळे, अ‍ॅड. प्रकाश कवठेकर, किशोर पिंगळे, विनोद इंगोले, विजय लव्हाळे, अशोक ठाकरे, शरद चव्हाण, रमेश चव्हाण, सुनील सुरवसे, अ‍ॅड. महेश धांडे, कुंदा काळे, प्रतिभा गायकवाड, राहुल वाईकर, युवराज जगताप, अशोक सुखवसे, दीपक आमटे, सागर बहीर उपस्थित होते...तर आमदारांना बांगड्यांचा आहेरराज्य अधिवेशनात कोपर्डी येथील बलात्कार व खून प्रकरणाचा मुद्दा उपस्थित न करणाऱ्या आमदारांना बांगड्यांचा आहेर देण्यात येईल, असा इशारा या बैठकीत अशोक हिंगे, अ‍ॅड. प्रकाश कवठेकर यांनी दिला. (प्रतिनिधी)