विठ्ठल फुलारी, भोकरतालुक्यातील सात लघू तलावातील गाळ काढणे व तलाव दुरूस्त करण्यासाठी केंद्रीय साह्य दुरूस्ती नूतनीकरण व पुनर्स्थापना अंतर्गत निधी प्राप्त झाला आहे़ या निधीतून दुरूस्तीचे कामे चालू झाली असली तरी काढलेला गाळ घेवून जाण्यास शेतकरीच तयार नसल्याने तालुक्यातील सिंचनक्षेत्र वाढविण्याच्या प्रयत्नालाच खीळ बसली आहे़भोकर तालुक्यातील कांडली, धानोरा, इळेगाव, आमठाणा, किनी, लामकाणी व भुरभूशी या ठिकाणच्या सातही लघू तलावाची अवस्था दयनीय झाली आहे़ तर यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे़ या सातही लघू तलावाची सिंचनक्षमता २ हजार ८४८ हेक्टर असली तरी आजघडीला केवळ ५१३ हेक्टर शेतीच सिंचनाखाली येत होती़ यामुळे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने या सातही लघू तलावाची व कॅनलची दुरूस्ती व गाळ काढणे या कामासाठी केंद्रीय साह्य दुरूस्ती नूतनीकरण व पुनर्स्थापना अंतर्गत ५ कोटी ४४ लाख १६ हजारांचा निधी प्राप्त झाला़ या निधीतून लामकाणी, इळेगाव, भुरभूसी व आमठाणा या तलावाची व कॅनलची दुरूस्तीचे काम चालू झाले आहे़ उर्वरित तलावाची दुरूस्ती लवकरच होणार आहे़ या तलावापैकी धानोरा तलावातील पाणी ०़२० दलघमी पाणी भोकर शहरासाठी आरक्षित करण्यात आले आहे़शेतकऱ्यांची भूमिका महत्त्वाचीतालुक्यातील सात तलावातील गाळ काढण्यासाठी व तलाव कॅनल दुरूस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी येवूनही या तलावातील गाळ तसाच राहिला तर या झालेल्या निधीचा उपयोग शून्य राहणार आहे़ गाळ घेवून जाण्यासाठी शेतकऱ्यांची भूमिकाच आता महत्त्वाची ठरणार आहे़सदरील चार लघू तलावाच्या दुरूस्तीचे काम चालू असले तरी प्रथम प्राधान्य गाळ काढण्यासाठी देणे गरजेचे होते़ तरीपण किनी येथील लघू तलावातील गाळ काढण्याचे काम पाटबंधारे व्यवस्थापन उपविभागाने हाती घेतले होते़ मागील वर्षी या तलावातील ६ हजार घनमीटर तर यावर्षी ५ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला़ नंतर गाळ घेवून जाण्यास शेतकऱ्यांनी उदासिनता दाखविल्याने हा गाळ तसाच राहिला़ आजच्या घडीला पाटबंधारे व्यवस्थापन उपविभाग गाळ काढण्यास तयार असला तरी शेतकरी मात्र हा गाळ आपल्या शेतात घेवून जाण्यास तयार नसल्याने या लघू तलावाची साठवण क्षमता अल्प राहणार आहे़
भोकर तालुक्यात सिंचनक्षेत्र वाढविण्याच्या आशा धुसर
By admin | Updated: June 24, 2014 00:40 IST