शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पिकांची आशा मावळली; चाऱ्याची काळजी संपेना

By admin | Updated: July 29, 2015 00:49 IST

बीड : खरीप हंगामातील पिकांबाबत शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या आहेत. चाऱ्याअभावी पावसाळ्यातही जनावरे दावणीला बांधावी लागत आहेत

बीड : खरीप हंगामातील पिकांबाबत शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या आहेत. चाऱ्याअभावी पावसाळ्यातही जनावरे दावणीला बांधावी लागत आहेत. हिरवा चारा तर लांबच परंतु कडबा मिळणे देखील मुश्किल झाले आहे. खरीप हातचा गेल्याने उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका तर बसलाच आहे. आता जनावरे जगवायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. खरिपातील पिकांची लागवड केल्यापासून पावसाने ओढ दिल्याने सर्व पिके धोक्यात आली आहेत. पावसाने घोर निराशा केल्याने भर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चाऱ्याअभावी व उन्हापासून बचाव होण्याच्या हेतूने जनावरे दुपारच्या वेळी दावणीला बांधली जायची. मात्र यंदा भरपावसाळ्यातही उन्हाळ्याच्या झळा बसत आहेत. अद्यापर्यंत एकही दमदार पाऊस झाला नसल्याने हिरव्या चारा तर उगवलाच नाही. चाऱ्याचा हातचा शिल्लक असावा म्हणून बाजारपेठात चाऱ्याची आवक घटली आहे. वाळलेल्या चाऱ्यातही कडब्याशिवाय पर्यायच नाही. जिल्ह्यातील कडब्याचा साठा शुन्य टक्के झाल्याने इतर जिल्ह्यातून चाऱ्याची आवक केली जात आहे. सध्या पावसाचे वातावरणही नसल्याने एक दिवसाआड चाऱ्याचे दर वाढत आहेत. गत महिन्यात १५०० शेकड्यावरचा कडबा सोमवारी २८०० रुपयांवर पोहचला होता. आर्थिक बाजू खालावल्याने शेतकऱ्यांना वाळलेला कडबाही खरेदी करणे अवघड झाले आहे. पावसाच्या आशेवर तात्पूरते भागेल या भावनेने शेतकरी आठ दिवस पुरेल एवढाच कडबा खरेदी करीत आहे. हिरवा चारा उपलब्ध नसल्याने त्याच्या बाजारपेठा बंद पडल्या आहेत. चाराटंचाईचा परिणाम दुग्धव्यवसायावरही झाला असून दुध संकलन निम्म्यावर आले आहे. उत्पादनाचे नुकसान व जोड व्यवसायही धोक्यात आल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. जनावरांची आठवडी बाजारात गर्दी होत आहे. मात्र कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना जितराब सांभाळण्याशिवाय पर्यायच नाही. यंदा सलग तिसऱ्या वर्षी पावसाने दगाबाजी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात चाराछावण्या व चारा डेपो सुरू करण्याची मागणी होत आहे. चाऱ्याबरोबर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न उद्भवला आहे. (प्रतिनिधी)