शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नियम डावलून वाढविली घरपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:00 IST

शासनाच्या नियमांना डावलून महापालिकेने घरपट्टीत वाढ केली असून, अवास्तव घरपट्टी नागरिकांवर लादल्याने संताप व्यक्त होत आहे. वाढीव घरपट्टीच्या नोटिसा दिल्यानंतर मागील एक महिन्यापासून शहरातील नागरिक हवालदिल झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शासनाच्या नियमांना डावलून महापालिकेने घरपट्टीत वाढ केली असून, अवास्तव घरपट्टी नागरिकांवर लादल्याने संताप व्यक्त होत आहे. वाढीव घरपट्टीच्या नोटिसा दिल्यानंतर मागील एक महिन्यापासून शहरातील नागरिक हवालदिल झाले आहेत.ठराविक कालावधीनंतर शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करुन पुनमूर्ल्यांकन करणे अपेक्षित असताना परभणी महापालिकेने तब्बल १७ वर्षानंतर मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केले आहे. हे मूल्यांकन करीत असताना ंअनेक मालमत्ताधारकांना ११ पट घरपट्टी दिली आहे. त्यामुळे ज्यांना पूर्वी १०० रुपये घरपट्टी होती, त्यास १ हजार रुपयांपर्यंत घरपट्टी दिली जात आहे. या अवाढव्य घरपट्टीमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. शासनाच्या नगरविकास विभागाच्या १६ सप्टेंबर २००० च्या परिपत्रकानुसार पुनर्मूल्यांकन करीत असताना होणारी करवाढ ही कर मूल्याच्या अर्ध्या पटीपेक्षा जास्त राहणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे जर चार वर्षांनी कर मूल्यांकन होत असेल तर मूल्याच्या दीड पटीपेक्षा अधिक मूल्य जाणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. याचाच अर्थ कर वाढवित असताना १०० रुपये कर असेल तर सुधारित कर १५० रुपयांपेक्षा अधिक असता कामा नये, असे शासनाचे परिपत्रक आहे. मात्र महापालिकेने ११ पट कर वाढ केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या माथी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कराचा बोझा टाकण्यात आला आहे. मनपाने केलेल्या मालमत्ता कराच्या वाढीला सर्वच स्तरातून जोरदार विरोध होत असून, याबाबतचे आक्षेप दाखल करणाºयांची संख्याही मोठी आहे. कुठल्याही सुविधा नसताना किंवा सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न होत नसताना मालमत्ता कर मात्र भरमसाठ वाढविण्यात आला आहे. याबाबत सत्ताधारी काँग्रेस पक्षाने चुप्पी साधली असून शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत आंदोलन सुरू केले आहे.