शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

वीजचोरीमुळे घरातील मीटर जाणार खांबावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 12:17 IST

वीज गळती रोखण्याचा फंडा 

ठळक मुद्देउघड्या तारांऐवजी एरिअल बंच केबल, मल्टीमीटर बॉक्स बसविण्यात येणार

औरंगाबाद : शहरातील वाढत्या वीज गळतीवर मात करण्यासाठी महावितरणने शहरातील सर्वाधिक वीजहानी असलेल्या ३७ फिडरवर उघड्या तारांऐवजी ‘एरिअल बंच केबल’ (एबीसी) व खांबावर मल्टीमीटर बॉक्स बसविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सहा महिन्यांत हे काम पूर्ण केले जाणार आहे.

शहरात महावितरणचे सर्व मिळून ३ लाख ७ हजार वीज ग्राहक आहेत. या ग्राहकांना जवळपास ११ केव्ही क्षमतेच्या १५१ फिडरवरून वीजपुरवठा होतो. यातील ६४ फिडर हे एक्स्प्रेस फिडर आहेत. त्यावरून प्रामुख्याने उच्चदाब औद्योगिक ग्राहकांना वीजपुरवठा होतो, तर उर्वरित ८७ फिडरवरून घरगुती, व्यावसायिक ग्राहकांना वीजपुरवठा होतो. यापैकी ३७ फिडरवरील वीजगळती ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. वीजचोरीसह अनधिकृत वीज वापराचे प्रमाणही याच फिडरवर जास्त आहे. या ३७ फिडरवरील ६९ हजार वीज मीटर बदलण्यात येणार असून, ते सर्व मीटर खांबावर मल्टीमीटर बॉक्समध्ये बसविले जाणार आहेत. या कामासाठी जवळपास ३८ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आॅगस्ट महिन्यात या कामाची सुरुवात केली जाणार आहे.

या योजनेत शहरातील जास्त वीज गळती असलेल्या भागात एरिअल बंच केबल लावल्या आहेत. एरिअल बंच केबल इन्सुलेटेड केबल असून, त्यावर आकडा टाकून वीजचोरी करता येत नाही. इन्सुलेशन असल्याने या केबलला चुकून स्पर्श झाला तरी अपघाताचा धोका नसतो. केबलचा एकमेकींना स्पर्श झाला तरीही वीजपुरवठा खंडित होत नाही. शहरातील सध्या विविध भागांत असलेल्या खांबांवरील २६५.३३ कि.मी. अंतराच्या तारा काढून त्याठिकाणी एरिअल बंच केबल बसविण्यात येणार आहेत. 

वीज गळतीवर उपाय म्हणून काही ग्राहकांचे मीटर स्थलांतरित करण्यात येणार आहेत. शहरातील अनेक भागांतील ग्राहकांच्या घरात वीज मीटर बसविण्यात आले आहेत. नवीन योजनेत ग्राहकांच्या घरात लावलेले मीटर विद्युत खांबांवर मल्टीमीटर बॉक्समध्ये बसविण्यात येणार आहेत. एका मल्टीमीटर बॉक्समध्ये सुमारे १२ मीटर बसविण्यात येतील. या बॉक्सची चावी महावितरणच्या तंत्रज्ञांकडे किंवा मीटर रीडिंग घेणाऱ्या एजन्सीकडे राहील. खांबावर ८ हजार २८७ मीटर बॉक्स बसविण्यात येणार आहेत. यामध्ये ६९ हजार ५५४ ग्राहकांचे मीटरही बसविण्यात येणार आहेत. 

कोणते फिडर महावितरणच्या रडारवरपॉवर हाऊस उपविभागातील मकबरा, पॉवर हाऊस, वसंत भवन, पाणचक्की, सिटीचौक पोलीस ठाणे, छावणी उपविभागातील राहुलनगर, दर्गा, पेठेनगर, छावणी, प्रियदर्शिनी, मिलिंद महाविद्यालय, आयटीआय, होलिक्रॉस, शाहगंज उपविभागातील रोशनगेट, गणेश कॉलनी, जसवंतपुरा, जकात नाका, आझाद चौक, औरंगाबाद टाइम्स कॉलनी, कटकटगेट, दिल्लीगेट, आरती, जमन ज्योती, भीमटेकडी, सुभेदारी, वॉटर वर्क्स, रोझाबाग, चिकलठाणा उपविभागातील चिकलठाणा, संजयनगर, नारेगाव, सारासिद्धी व क्रांतीचौक उपविभागातील निझामुद्दीन, मोंढा, सेव्हन हिल, दूध डेअरी, रंगमंदिर, आयटीआय या सर्वाधिक वीजगळती असलेल्या फिडरवर या योजनेतील कामे केली जाणार आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरणelectricityवीज