शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

इतिहास अपडेट होणारे शास्त्र; त्याचा स्वीकार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 21:31 IST

सातव्या औरंगाबाद फिल्म फेस्टिव्हलमध्ये गुरुवारी ( दि.६) आयोजित या परिसंवादात पटकथा लेखक चिन्मय मांडेलकर, दिग्दर्शक ओम राऊत, प्रसाद ओक आणि दिग्पाल लांजेकर या सिनेसृष्टीतील दिग्गजांनी परखड मते मांडली. 

औरंगाबाद : इतिहासावर सर्व बाजूंनी कायम संशोधन सुरू असते. यातून नव्या गोष्टी पुढे येतात. यामुळे इतिहास हे कायम अपडेट होणारे शास्त्र असून, त्याचा सर्वांनी स्वीकार करायला हवा, असा स्वर ‘इतिहास आणि चित्रपटविषयक स्वातंत्र्य’ या विषयावरील परिसंवादातून उमटला. सातव्या औरंगाबाद फिल्म फेस्टिव्हलमध्ये गुरुवारी ( दि.६) आयोजित या परिसंवादात पटकथा लेखक चिन्मय मांडेलकर, दिग्दर्शक ओम राऊत, प्रसाद ओक आणि दिग्पाल लांजेकर या सिनेसृष्टीतील दिग्गजांनी परखड मते मांडली. 

परिसंवादात सुरुवातीलाच ऐतिहासिक सिनेमा निर्मितीच्या मागची काय प्रेरणा असते यावर मान्यवरांनी मते मांडली. यात ओम राऊत आणि दिग्पाल लांजेकर यांनी हॉलिवूड चित्रपटापासून प्रेरणा घेऊन आपला देदीप्यमान इतिहाससुद्धा अशाच प्रकारे पुढे आणण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. तर कोणत्याही काळातील आईची बाळाबद्दलची ओढ दाखविण्यासाठी हिरकणीची निर्मिती झाल्याचे प्रसाद ओक यांनी सांगितले. तसेच चित्रपटात कधी कधी इतिहासाची मोडतोड ही पटकथेची गरज म्हणून केली जाते. मात्र यातून इतिहास प्रभावानेच मांडला जावा हाच हेतू असतो, असेही मान्यवर म्हणाले. यासोबतच ऐतिहासिक चित्रपटातील गाणी ही आगंतुक नसून कथेला पुढे नेण्याची योजना असते, असेही सर्वांनी स्पष्ट केले. 

आम्ही ‘सॉफ्ट टार्गेट’कुठल्याही ऐतिहासिक चित्रपटाचे पोस्टर, ट्रेलर आले की वाद ठरलेला आहे. विषयाचा अभ्यास न करता त्यावर लगेच सोशल मीडियातून व्यक्त होण्याने अडचणी वाढत आहेत. कथा, त्यावर अभ्यास, पटकथा, निर्माता आणि नंतर चित्रपट पडद्यावर येण्यास खूप कालावधी जातो. यात कष्ट असतात. मात्र प्रसिद्धीसाठी आम्ही ‘सॉफ्ट टार्गेट’ असल्याने काही जण वाद पेटवतात. इतिहासात राजकारण घुसल्याने विपरित परिस्थिती उद्भवते, असे मत दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी मांडले. 

आगामी काळात ८ ऐतिहासिक चित्रपटांची मेजवानी सिनेमातून इतिहासाचा अर्थबोध झाला पाहिजे. यातून खरी गोष्ट सांगता आली पाहिजे. तसेच चित्रपटातून रोमान्स की इतिहास नेमके काय दाखवायचे हे दिग्दर्शकाचे स्वातंत्र्य आहे, असेही दिग्दर्शक दिग्पाल म्हणाले. यासोबतच शिवाजी महाराजांच्या पराक्रमावरील चित्रपट निर्मितीची प्रक्रिया सुरूअसून, आम्ही ८ ऐतिहासिक चित्रपटांची मालिकाच करीत आहोत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादmarathiमराठीhistoryइतिहासChinmay Mandlekarचिन्मय मांडलेकरDigpal Lanjekarदिग्पाल लांजेकरPrasad Oakप्रसाद ओक