शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

पर्यटन राजधानीचा ऐतिहासिक वारसा राष्ट्रगीतात चित्रित; औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 19:57 IST

१४ फेब्रुवारी रोजी एमजीएम संस्थेच्या रुक्मिणी सभागृहात सायंकाळी ५ वाजता होणार लोकार्पण.

ठळक मुद्देके. के. मोहम्मद यांच्या हस्ते लोकार्पण

औरंगाबाद : ऐतिहासिक वास्तूंमुळे जागतिक नकाशावर असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील वारसा ५२ सेकंदांच्या ‘राष्ट्रगीता’मध्ये चित्रित केला आहे. या वैभवशाली वारसाचे दर्शन घडविणाऱ्या राष्ट्रगीताचे लोकार्पण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे  माजी संचालक आणि आगाखान सेंटर फॉर कल्चर अ‍ॅण्ड हेरिटेजचे विद्यमान प्रकल्प संचालक डॉ. के. के. मोहम्मद यांच्या हस्ते १४ फेब्रुवारी रोजी एमजीएम संस्थेच्या रुक्मिणी सभागृहात सायंकाळी ५ वाजता होणार आहे. 

औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीतर्फे दोन वर्षांपूर्वी राष्ट्रगीतात वैभवशाली वारसा चित्रित करण्याचा ‘अमेझिंग औरंगाबाद : जन गण मन’ हा प्रकल्प हाती घेतला होता. त्यास सेंसॉर बोर्डाकडून नुकतीच मंजुरी मिळाली आहे. यानंतर त्याचे लोकार्पण करण्यात येत असल्याची माहिती सोसायटीचे सदस्य अ‍ॅड. स्वप्नील जोशी यांनी महाराष्ट्र गांधी भवन स्मारक निधी संस्थेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. देशात प्रसिद्ध असलेल्या ‘मिले सूर मेरा तुम्हारा’च्या धर्तीवर प्रत्येक ऐतिहासिक वास्तंूच्या ठिकाणी राष्ट्रगीताचे कडवे मान्यवरांनी गायले आहे. अशा पद्धतीने बहुतांश वास्तू या राष्ट्रगीतामधून दाखविण्याचा प्रयत्न केला असल्याची माहितीही अ‍ॅड. जोशी यांनी दिली.

या ऐतिहासिक वास्तूंमध्ये अजिंठा- वेरूळ लेणी, दौलताबादचा किल्ला, बीबीका मकबरा, हिमायतबाग, जायकवाडी धरण, दिल्लीगेट, घाटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, मराठवाडा अ‍ॅटो क्लस्टर, सरस्वती भुवन शिक्षण संस्था, नुकतेच तयार झालेले रामकृष्ण मंदिर आदींचा समावेश आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच शहर आणि जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूंचा वारसा राष्ट्रगीतामधून दाखविण्यात येत आहे. या कार्यक्रमाला शहरवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन, संस्थेच्या सचिव डॉ. बिना सेंगर,  अ‍ॅड. जोशी यांनी केले. या पत्रकार परिषदेला औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीचे सदस्य प्रमोद माने, स्वप्नील खरे, अमित देशपांडे आदी उपस्थित होते.

या महनीय व्यक्तींनी गायले राष्ट्रगीतऐतिहासिक वास्तूंच्या ठिकाणी शहरातील महनीय व्यक्तींनी राष्ट्रगीताचे कडवे गायले आहे. यामध्ये पद्मश्री डॉ. यू. म. पठाण, फातेमा झकेरिया, दिवंगत दिनकर बोरीकर, बा. वि. गर्गे, पंडित नाथराव नेरळकर, पंडित विश्वनाथ ओक, स्वातंत्र्यसैनिक  ना. वि. देशपांडे, ताराबाई लड्डा, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, प्रा. दिलीप घारे, कवी डॉ. दासू वैद्य, इतिहासकार रा. श्री. मोरवंचीकर, डॉ. दुलारी कुरेशी, रफत कुरेशी, जलतज्ज्ञ प्रा. प्रदीप पुरंदरे, पक्षीमित्र दिलीप यार्दी, उद्योजक राम भोगले, चित्रकार विजय कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय छायाचित्रकार बैजू पाटील, एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, प्राचार्य प्रतापराव बोराडे, साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे, बाबा भांड, कुलगुरू डॉ. वि. ल. धारूरकर, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. स्मिता अवचार यांच्यासह उद्योजक, घाटीतील डॉक्टर, परिचारिका,  विद्यार्थी आदींचा समावेश आहे. 

टॅग्स :National Anthemराष्ट्रगीतAurangabadऔरंगाबादhistoryइतिहास