शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

हिरकणी कक्षात भंगार अन् पार्सलचे दुकान !

By admin | Updated: August 17, 2014 01:05 IST

लातूर, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी, यासाठी परिवहन महामंडळाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे़ दोन वर्षांपूर्वी बसस्थानकात

लातूर, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी, यासाठी परिवहन महामंडळाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे़ दोन वर्षांपूर्वी बसस्थानकात हिरकणी कक्षाची उभारणी करण्यात आली़ कक्षात महिलांना आपल्या बाळाला स्तनपान करता यावे, शांत ठिकाण असावे, यासाठी विशेष कक्ष स्थापन्यात आले़ लातूरच्या मध्यवर्ती बसस्थानकात ६ बाय १२ च्या रूमवर हिरकणी कक्षाचे फलक डकविण्यात आले आहे़ मात्र, दोन तास शोध घेऊनही कक्ष आढळून आला नाही़ छोट्याशा खोलीत भंगाराचे साहित्य टाकून हिरकणी कक्षाचे भंगार ठेवण्याचे गोदाम करण्यात आल्याचे शनिवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशनमध्ये उघडकीस आले आहे़लातूरच्या मध्यवर्ती बसस्थानकात दररोज हजारो प्रवाशांची येजा होते़ मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, बीड, परभणी, जालना, ठाणे, कोल्हापूरसह परराज्यातही बसेस धावतात़ त्यामुळे येथील बसस्थानकावर २४ तास प्रवाशांची गर्दी असते़ शांत शहर म्हणून ओळख असलेल्या लातूरच्या बसस्थानकात महिला प्रवाशांची मात्र कुचंबना होत आहे़ शनिवारी दुपारी मध्यवर्ती बसस्थानकातील हिरकणी कक्षाची पाहणी करण्यात आली असता कुठेच कक्ष दिसला नाही़ लहान मुलांना घेऊन बसलेल्या अनेक महिला भिंतीचा आडोसा घेऊन बसल्या होत्या़ त्याचबरोबर कॅन्टीनच्या समोरच्या खुल्या जागेतही ५ महिला आपल्या लहान बाळांना स्तनपान करीत होत्या़ बाजूनेच अनेक पुरूष प्रवासी ये-जा करीत होते़ डोक्यावरील पदर सावरत काही महिला बाळांच्या आरोग्याची काळजी घेत असल्याचे दिसून आले़ अधिकाधिक सुविधा देऊन प्रवासी वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाचा बसस्थानकातील ‘हिरकणी कक्ष’ नुसताच फलक लावून सुरू करण्यात आला आहे़राज्य परिहवहन महामंडळाच्या लातूर येथील मध्यवर्ती बसस्थानकात दिवभर भोंग्याद्वारे प्रवाशांना सूचना, सल्ला व सेवेची माहिती देण्याचे काम केले जाते़ अर्धा तासाच्या वेळेत किमान दहा वेळा तरी महिला प्रवाशांना आपल्या बाळांना स्तनपान करण्यासाठी हिरकणी कक्षाचा आधार घेण्याचे आवाहन करण्यात येत होते़ ४प्रवाशांनो आपले सामान, गळ्यातील दागिने चोरीला जाऊ शकतात, त्यामुळे काळजी घ्या, बेवारस वस्तू आढळून आल्यास हात लावू नका, संशय आल्यास स्थानकप्रमुखाला माहिती द्या, अशी जाहिरात केली जाते़ त्यात हिरकणी कक्षाचेही तुनतुने वाजविण्यात आले आहे़ मात्र, कक्ष नुसताच फलक लावून कागदोपत्री दाखविण्यात आला आहे़ सेवेचा लाभ कोणत्याही गरजूला मिळत नसल्याचे आढळून आले आहे़ ४जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण असलेल्या लातूरच्या मध्यवर्ती बसस्थानकात असलेल्या हिरकणी कक्षाच्या दारावर पान-सुपारीच्या पिचकाऱ्या मारलेल्या आहेत. आतमध्ये डोकावून पाहिल्यास भंगार साहित्य पडून आहे.श्रीपाद सिमंतकर ल्ल उदगीरउदगीर येथील बसस्थानकाला प्रशस्त जागा आहे़ सीमावर्ती भाग जोडला गेल्याने येथील बसस्थानकात दिवसभर प्रवाशांची मोठी वर्दळ असते़ महिला प्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणात असताना याठिकाणी हिरकणी कक्षाची उभारणीच करण्यात आली नाही़ याबाबत आगारप्रमुख एस़आऱबाशा म्हणाले, उदगीरला कक्ष मंजूर आहे, लवकरच बांधकाम करून कक्ष सुरू करण्यात येईल़ सहाय्यक सरकारी वकिल जयश्री पाटील म्हणाल्या, स्त्री सन्मान, रक्षण व सुरक्षितता यावर देशभर चिंतन होत आहे़ उदगीर आगाराने हिरकणी कक्षाकडे दुर्लक्ष करणे ही बाब अशोभणीय आहे़ माय-लेकरांचा आशिर्वाद घेण्यासाठी उदगीर स्थानकात तात्काळ हिरकणी कक्ष सुरू करण्यात यावा, अशी मागणी प्रा़माधुरी नायगावकर यांनी केली़