शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत पुन्हा वीज प्रश्न पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 23:38 IST

जिल्ह्यातील विविध गावातील विजेचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे शेतकºयांना पीकांना पाणीही देता येत तर नाहीच, परंतु रात्रही अंधारात काढावी लागते आहे. त्यामुळे ९ ते १० गावातील शेतकºयांनी शुक्रवारी (दि.१०) विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्यास घेराव घालून रोहित्राची मागणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील विविध गावातील विजेचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे शेतकºयांना पीकांना पाणीही देता येत तर नाहीच, परंतु रात्रही अंधारात काढावी लागते आहे. त्यामुळे ९ ते १० गावातील शेतकºयांनी शुक्रवारी (दि.१०) विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्यास घेराव घालून रोहित्राची मागणी केली. तीन दिवसात रोहित्र बदलून न दिल्यास कार्यालयास कुलपू ठोकण्याचा इशारा राष्टÑवादी काँग्रेसने दिला.मागील काही दिवसांपूर्वी विद्युत वितरण कंपनीच्यावतीने शेतकºयांना कोणतीही पूर्व कल्पना न देता कृषीचा विद्युत पुरवठा खंडीत केला. त्यामुळे शेतकºयांना रबीच्या पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. काही गावठान फिडरचाही पुरवठा खंडीत केल्याने ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. शुक्रवारी ९ ते १० गावातील शेतकरी एकत्र आले. राष्ट्रवादीच्या नेतृत्वात त्यांनी महावितरणच्या अभियंत्याच्या दालनासमोर ठिय्या दिला. यावेळी जि. प. उपाध्यक्ष अनील पतंगे, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, सपाचे जिल्हाध्यक्ष शेख नईम शेख लाल आदीसह शेतकºयांची उपस्थिती होती. शेतकºयांनी आप- आपल्या गावातील रोहित्राची व्यथा अधिकाºयांसमोर मांडली. यामध्ये उटी ब्रम्हचारी येथे ३ रोहित्र, चिखलागर १, वडहिवरा १, हुडी लिंबाळा १, वरुड गवळी १, वायचाळ पिंपरी २, लोहगाव १, सवना २, गोरेगाव २, वारंगा मसाई ३ असे एकूण १७ रोहित्रांचा प्रश्न समोर आला. यातील काही गावातील रोहित्र महावितरणमध्ये शेतकºयांनी स्वखर्चाने आणून टाकले आहेत. त्यामुळे अनेक गावातील शेतकरी अंधाराचा सामना करत आहे. वीज बिलाचे पैसे भरण्यासाठी कमी भावाने सोयाबीन विकण्याची वेळ आल्याचे शेतकरी मोठ्या पोटतिडकीने सांगत होते. एकूण १४० रोहित्राचा प्रश्न आहे. आॅईल नसल्याने अडचणी येत आहेत. येत्या चार ते आठ दिवसात आॅईल उपलब्ध होणार आहे. सर्वच रोहित्राचा प्रश्न सुटणार असल्याचे कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी यांनी सांगितले. तसेच शेतकºयांनी थोडा धीर धरण्याचेही त्यांनी आवाहन केले.