शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

भाविकांच्या गर्दीने महामार्ग फुलला

By admin | Updated: October 26, 2015 00:01 IST

तामलवाडी : कोजागिरी पौर्णिमा उत्सवानिमित्त श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीने तुळजापूर-सोलापूर महामार्ग फुलून गेल्याचे रविवारी दिसून आले.

तामलवाडी : कोजागिरी पौर्णिमा उत्सवानिमित्त श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीने तुळजापूर-सोलापूर महामार्ग फुलून गेल्याचे रविवारी दिसून आले. ‘आई राजा उदो उदोऽऽ’ चा जयघोष करीत तुळजाभवानीच्या दर्शनाची आस मनात ठेवून निघालेल्या या भाविकांच्या सोईसाठी विविध संस्था, संघटनांनी रस्त्यावर स्वागताचे फलक लावून त्यांच्या चहा-पान व अन्नदानाचीही सोय केली आहे. सोमवार आणि मंगळवार अशी दोन दिवस पौर्णिमा असल्यामुळे रविवारपासूनच आंध्र, कर्नाटकातील भाविक सोलापूर येथून तुळजापूरकडे पायी दाखल होत आहेत. डोक्यावर उन्हाचे चटके घेत निघालेले हे भाविक थकवा आल्यानंतर मिळेल त्या जागेवर विसाव्याला थांबत असल्याचे ठिकठिकाणी दिसून आले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत हजारो भाविक तुळजापूरच्या दिशेने रवाना झाले. महामार्गावर तामलवाडी शिवारात बालाजी अमाईन्स कारखान्याच्या वतीने तसेच सोलापूर येथील युवा क्लबच्या वतीने भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येत आहे. तसेच रविवारी भाविकांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन वाहतुकीसही बंदी करण्यात आली असून, सर्व वाहतूक ईटकळ मार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे पायी जाणाऱ्या भाविकांसाठी हा रस्ता पूर्णपणे खुला झाला आहे. दरम्यान, महामार्ग रूंदीकरणासाठी रस्त्यालगतची सर्व झाडे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे डोक्यावर उन्हाचे चटके घेत निघालेल्या भाविकांना रस्त्यात सावलीला थांबायचे म्हटले तरी कुठे जागा नसल्याचे दिसते. कर्नाटकातील काही भाविकांनी तामलवाडी पोलिस ठाणे आवारात विसावा घेतल्याचे तर अनेक भाविक महामार्गालगत असलेल्या शेतात जावून विश्रांती घेत असल्याचे दिसून आले. दरम्यान, तामलवाडी साठवण तलावातील पाणी सध्या सुरतगाव शिवारात आले असून, या पाण्यात स्रान करण्यासाठीही भाविकांनी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)