शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने; छत्रपती संभाजीनगरात राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 13:06 IST

छत्रपती संभाजीनगरात हायव्होल्टेज ड्रामा; महायुती- महाविकास आघाडीचे कार्यकर्ते समोरासमोर 

छत्रपती संभाजीनगरात: क्रांती चौकात आज दुपारी महाविकास आघाडी आणि महायुतीचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्हीकडील कार्यकर्त्यांकडून एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. 

ठाकरे सेनेची मशाल विरुद्ध शिंदेसेनेचा धनुष्यबाण असा थेट सामना औरंगाबाद लोकसभेत होत आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोघेही आपआपल्या उमेदवारांसाठी शहरात होते. आज दोन्हीकडून उमेदवारांच्या प्रचारार्थ रॅलीचे आयोजन करण्यात करण्यात आले. महायुतीची रॅली शिवाजीनगर येथून निघून क्रांतीचौक मार्गे टीव्ही सेंटर येथे जाणार होती. तर महाविकास आघाडीची रॅली क्रांतीचौक येथून निघणार होती. दरम्यान, दुपारी बारा वाजता दोन्ही रॅली समोरासमोर आल्या. यामुळे कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.

एकमेकांच्या उमेदवारांना केले लक्षविरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दारूच्या बॉटल हातात घेऊन महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना डिवचले. तर शिंदेसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी चंद्रकांत खैरे यांच्या समोर जात दंड थोपटले. तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांनी देखील यात उडी घेत ठाकरे गटावर शेरेबाजी केली. यावर दानवे यांनी उमेदवार नसलेल्यांनी काही बोलू नका म्हणत पलटवार केला. दरम्यान, यामुळे क्रांती चौकट प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसत आहे.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४