शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत हायप्रोफाइल आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 01:07 IST

औरंगाबाद : शहरातील प्रोझोन मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पोलिसांनी गुरुवारी रात्री पर्दाफाश केला.

ठळक मुद्देदोन स्पा सेंटरमध्ये सुरू होता गोरखधंदा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील प्रोझोन मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पोलिसांनी गुरुवारी रात्री पर्दाफाश केला. दोन वेगवेगळ्या स्पा सेंटरवर एकाच वेळी मारलेल्या धाडीत तीन ग्राहक, मॅनेजरसह थायलंडहून आणण्यात आलेल्या १२ मुली, ४ ग्राहक आणि ३ मॅनेजर यांना ताब्यात घेण्यात आले.

प्रोझोन मॉलमधील पहिल्या मजल्यावर अनंतरा स्पा आणि दी स्ट्रेस हब स्पा अ‍ॅण्ड सलून या नावाने दोन स्पा सेंटर काही वर्षांपासून सुरू आहेत. या सेंटरमध्ये हायप्रोफाइल आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट चालते. ग्राहकांना विदेशी मुली पुरविण्यात येतात, अशी माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांना मिळाली. यानंतर त्यांनी लगेच महिला तक्रार निवारण मंचच्या निरीक्षक किरण पाटील, पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे, वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक बिरारी आणि विशेष शाखा, पारपत्र शाखा, सायबर क्राइम सेल अशा विविध शाखांच्या सुमारे २५ कर्मचा-यांना सोबत घेऊन रात्री ८ वाजेच्या सुमारास मॉल गाठले.

दोन्ही स्पा सेंटरवर एकाचवेळी डमी ग्राहक पाठवून तेथील गोरखधंद्याची खात्री केली अन् लगेच दोन्ही स्पा सेंटरवर छापा मारला. दी स्ट्रेस हब स्पामध्ये पाच मुली, दोन ग्राहक आणि एक मॅनेजर होता, तर अनंतरामध्ये दोन विदेशी ग्राहकांसह आठ विदेशी मुली आढळल्या. यापैकी काही जणी ग्राहकांसोबत नको त्या अवस्थेत आढळल्या. यावेळी सर्व मुलींकडे थायलंडचा पासपोर्ट मिळाला. या मुली येथे कधी आल्या आणि त्यांना कोणता व्हिसा मिळाला, याबाबतची चौकशी पारपत्र शाखा करणार असल्याचे उपायुक्त डॉ. घाडगे यांनी पत्रकारांना सांगितले. पोलिसांची ही कारवाई रात्री ८ पासून रात्री उशिरापर्यंत सुरू होती. याविषयी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.अन् पोलीस अधिकाºयांनी रोखले रिव्हॉल्व्हरअनंतरामध्ये पोलिसांनी धाड मारली तेव्हा तेथे दोन विदेशी व्यक्ती सापडले. धडधाकट बांधा असलेले हे दोन्ही आरोपी पोलिसांना हातही लावू देत नव्हते. पोलिसांनी त्यांना पकडून बाजूला घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी पोलिसांच्या हाताला हिसका दिला. त्यांना आवरण्याच्या प्रयत्नांत त्यांनी चांगलाच धिंगाणा घातला. ते आवरत नसल्याचे लक्षात येताच पोलीस उपनिरीक्षक बिरारी यांनी त्यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखले आणि गप्प केले.