शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद हिंसाचाराची होणार उच्चस्तरीय चौकशी, 2 जणांचा झाला होता मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 14:04 IST

औरंगाबादमध्ये 11 मे व 12 मे रोजी घडलेल्या हिंसाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

औरंगाबाद -  औरंगाबादमध्ये 11 मे व 12 मे रोजी घडलेल्या हिंसाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांच्या शिष्टमंडळाला दिले आहे. तीन दिवसांत शहराला नवीन पोलीस आयुक्त देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

11 मे व 12 मे रोजी औरंगाबादेत दोन गटांत हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू झाला होता.  पोलिसांनी केलेला गोळीबार आणि दगडफेकीत 200 हून अधिक नागरिक जखमी झाले होते. या दंगलीत अनेकांची वाहने आणि दुकाने जाळण्यात आली. शेकडो वाहनांची तोडफोड करण्यात आल्याने सुमारे 10 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात नमूद करण्यात आले.

65 जणांविरोधात अटकेची कारवाईया प्रकरणी शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ, कार्यकर्ता लच्छू पहिलवान उर्फ लक्ष्मीनारायण बाखरिया, एमआयएमचा नगरसेवक फेरोज खान यांच्यासह आतापर्यंत 65 जणांना पोलिसांनी अटक केली आहेत. हिंसाचार घडवून आणणऱ्या अन्य लोकांची ओळख पटवून त्यांचे अटकसत्र पोलिसांकडून सुरूच आहे. दरम्यान सर्वपक्षीय मुस्लीम आमदारांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी रात्री भेटले. या शिष्टमंडळासोबत चर्चा केल्यानंतर या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले. ही चौकशी राज्याचे पोलीस महासंचालक(कायदा व सुव्यवस्था)बीपीन बिहारी हे करणार आहेत. दंगलीत नुकसान झालेल्या लोकांना नुकसान भरपाई देण्याची तयारीही त्यांनी दर्शविली. पोलीस दंगलीत पक्षपातीपणे वागल्याचा आरोप होत आहे. दंगलीत दोषी आढळलेल्या पोलिसांवरही कारवाई करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे शिष्टमंडळातील सदस्यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस