शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य सचिवांसह इतर प्रतिवाद्यांना खंडपीठाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 21:56 IST

राज्यातील हमाल माथाडी व तत्सम असंघटित कामगारांची मजुरी थेट बँक खात्यात जमा व्हावी, अशी विनंती करणारी जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल झाली आहे.

औरंगाबाद : राज्यातील हमाल माथाडी व तत्सम असंघटित कामगारांची मजुरी थेट बँक खात्यात जमा व्हावी, अशी विनंती करणारी जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल झाली आहे. या याचिकेच्या अनुषंगाने न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. आर.जी. अवचट यांनी राज्याच्या मुख्य सचिवांसह कामगार आणि पुरवठा विभागांचे सचिव आणि परभणीचे जिल्हाधिकारी यांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला आहे.

सहायक सरकारी वकील एस.बी. यावलकर यांनी प्रतिवाद्यांतर्फे नोटिसा स्वीकारल्या. या जनहित याचिकेची पुढील सुनावणी १५ फेब्रुवारी रोजी होणार आहे.परभणी जिल्ह्यात होऊ घातलेल्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे हमाल व माथाडी पुरवठादारांसोबतचा प्रस्तावित करारनामा न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहील, असे खंडपीठाने अंतरिम आदेशात म्हटले आहे. परभणी येथील एहसास जिंदगी ट्रस्टने अ‍ॅड. बी.एल. सगर किल्लारीकर यांच्यामार्फत खंडपीठात ही याचिका दाखल के ली आहे. त्यांनी याचिकेत म्हटल्यानुसार केंद्र शासनाने देशात ‘जनधन’ योजना राबविली असून, त्यानुसार कोट्यवधी लोकांनी बँकेत खाती उघडली आहेत. ज्यातील बहुतांश खात्यात आर्थिक व्यवहार झालेले नाहीत.

याच बँक खात्यांवर कामगारांची मजुरी जमा झाल्यास त्यात होणाऱ्या भ्रष्टाचाराला आपोआप आळा बसेल. त्यांना शासनदराने पूर्ण मजुरी मिळेल. परभणी जिल्ह्यात शासनाने नियुक्त केलेल्या कंत्राटदारांसोबत जिल्हाधिकाºयांचा करार झाला आहे. त्यात बँक खात्यामार्फत मजुरी देण्याची तरतूद नाही; मात्र नव्याने काढलेल्या निविदेत कंत्राटदाराचे व माथाडी मंडळाचे पैसे राज्य सरकार ‘आरटीजीएस’मार्फत बँकेत जमा करते. हीच पद्धत मजुरांना लागू करावी, अशी विनंती याचिकाकर्त्याने केली आहे.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAurangabadऔरंगाबाद