शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

अगं अगं सूनबाई ! काय म्हणता सासूबाई ? मंगळागौरीच्या गाण्यात चंद्रयान, समृद्धी मार्गाची छाप

By प्रशांत तेलवाडकर | Updated: August 25, 2023 19:36 IST

काही ठिकाणी सासरी तर काही ठिकाणी माहेरी मंगळागौरीचे आयोजन करण्यात आले होते.

छत्रपती संभाजीनगर : नवविवाहितांनी मंगळागौरी व महादेवाची विधीवत पूजा केली आणि त्यानंतर सर्व जणींनी मिळून फुगडीपासून ते सासू-सुनांच्या थट्टा मस्करीपर्यंतचे विविध खेळ खेळून धम्माल उडवून दिली. ''अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई'' या गाण्याला तर उपस्थित नातेवाईकांनी दाद दिली.

निज श्रावणातील पहिला मंगळवार आणि पहिली मंगळागौर. काही ठिकाणी सासरी तर काही ठिकाणी माहेरी मंगळागौरीचे आयोजन करण्यात आले होते. काहींनी घरात तर काहींनी मंगल कार्यालयात पूजा मांडली होती. महादेवाची पिंड आणून पूजा करण्यात आली. विविध झाडांची पाने, फुले यांनी पूजा सजविण्यात आली होती. नवविवाहिताच नव्हे तर घरातील आजीबाईही विविध दागिने घालून नटल्या होत्या. मग मंगळागौरीचा खेळ खेळणाऱ्या महिलांचा ग्रुप आला. १० ते १२ प्रकारे फुगडी खेळण्यात आली. त्यात सासू- सुनेची फुगडी, विहीणबाईची फुगडी, ताक फुगडी, दहीवडा, झिम्मा, तळ्यात- मळ्यात, खुर्ची का मिर्ची, नाच गं घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा या खेळ-गाण्यांचा महिलांनी आनंद लुटला, तिखट मीठ मसाला, ''कीस बाई कीस... दोडका कीस'', माझी आई मोठी की तुझी आई मोठी'' असे अनेक खेळ एका मागून एक घेण्यात आले. या खेळात दोन तास कसे निघून गेले, हे कोणाला कळालेच नाही. त्या नंतर सर्वांनी एकत्र जेवणावर ताव मारला.

सेल्फीच्या उखाण्याला मिळाली दादहडकोतील कुलस्वामिनी मंडळातील महिलांनी मंगळागौरीचा खेळ खेळत व नावीन्यपूर्ण उखाणे म्हणत धमाल उडवून दिली. '' मोबाईलच्या दुनियेला व्हॉट्स ॲपचा वेढा, महेशरावांना म्हटलं आपली एक तरी सेल्फी काढा'' या उखाण्याला टाळ्यांची साथ मिळाली. त्याचबरोबर वृषाली घन, कल्याणी पूर्णपात्रे, प्राजक्ता दिवेकर, अनिता चौधरी, सुलभा वाकळे, संगीता देशपांडे, अनामिका पाटील, अदिती राजहंस, भक्ती कुलकर्णी, अनिता कार्यकर्ते, अमृता कार्यकर्ते, पूजा रामदासी यांनी उखाणे म्हणत आपल्या कल्पकतेची चुणूक दाखवून दिली.

चंद्रयान ३ ची क्रेझ मंगळागौरीतओंजळ ग्रुपने मंगळागौरीच्या खेळात पारंपरिकता व नव्या खेळांचा उत्तम संगम साधला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद