शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

इथे ‘भय’ संपले...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 23:57 IST

केंद्र शासनाने दोन वर्षांपूर्वी औरंगाबाद शहराची ‘स्मार्ट सिटी’प्रकल्पात निवड केली. शहर स्मार्ट करण्यासाठी सध्या मनपा कामाला लागली आहे. शहरात आजही असंख्य नियमबाह्य कामे करण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : केंद्र शासनाने दोन वर्षांपूर्वी औरंगाबाद शहराची ‘स्मार्ट सिटी’प्रकल्पात निवड केली. शहर स्मार्ट करण्यासाठी सध्या मनपा कामाला लागली आहे. शहरात आजही असंख्य नियमबाह्य कामे करण्यात येत आहेत. त्याकडे मनपा प्रशासन अजिबात लक्ष देत नाही. दुभाजकात कचरा टाकणे, सिमेंट-डांबरी रोड खोदून अवैध नळ कनेक्शन घेणे, जिथे जागा मिळेल तिथे पोस्टर्स, होर्डिंग लावणे. मनपाची खुली जागा दिसली, तर त्वरित अतिक्रमण करणे, रस्त्याच्या कडेला दुकाने थाटणे, मनपाच्या पथदिव्यांमधून वीज कनेक्शन घेणे, ग्रीन झोनमध्ये अवैध प्लॉटिंग करून विकणे, अशा शेकडो नियमबाह्य कामांकडे मनपा डोळेझाक करीत आहे.महाराष्टÑ महापालिका अधिनियमात महापालिकेला स्वतंत्र अधिकार दिले आहेत. कायद्याचा बडगा उगारण्यास सुरुवात केल्यावर नागरिकांनाही एक शिस्त लागेल. वर्षानुवर्षे बेशिस्तीचे दर्शन या शहराला होत आहे. मनपाच्या दप्तरी दोन लाख मालमत्ताधारक आहेत. त्यातील सव्वा लाख मालमत्ताधारक दरवर्षी महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा कर देतात. शहरातील करदात्यांना मूलभूत सोयीसुविधा देण्याचे आद्यकर्तव्य मनपावर आहे. अनेकदा करदाते बाजूला राहतात आणि अनधिकृत वसाहतींमधील मालमत्ताधारकच सोयीसुविधांचा उपभोग घेत असल्याचे (पान २ वर)अशी आहे, वस्तुस्थितीदुभाजकात कचरा टाकणे- शहरातील प्रमुख रस्त्यांवर दुभाजक उभारण्यात आले आहेत. या दुभाजकांचा वापर चक्क कचरा कुंडीसारखा करण्यात येतोय. हा कचरा सहजासहजी काढता येत नाही. त्यामुळे सफाई कर्मचारीही त्याकडे दुर्लक्ष करतात. अनेक महिने हा कचरा तसाच पडून राहतो. कचरा टाकणाºयांवर कारवाईचा बडगा कोणी उगारावा. किलेअर्क, मकबरा रोडवरील दुभाजकावर कपडे वाळवायला टाकण्याची प्रथाही सुरू झाली आहे.अवैध नळ कनेक्शन- एका रात्रीतून नागरिक अवैध नळ घेतात. यासाठी सिमेंट, डांबरी रोडही खोदून टाकण्यात येतो. शहरात एक लाखाहून अधिक अवैध नळ कनेक्शनची संख्या आहे. एक हजार वेळेस मनपाने अभय योजना राबविली; पण कोणीही आपले नळ अधिकृत करून घेत नाही. दोन वर्षांपासून तर पाणीपट्टी वसुलीही पूर्णपणे ठप्प आहे.अवैध पोस्टर्स, होर्डिंग- शहरातील प्रत्येक प्रमुख रस्त्यांवर मोठ-मोठे होर्डिंग लावले आहेत. आता काही होर्डिंग तर कायमस्वरूपीचे झाले आहेत. उड्डाणपूल असेल किंवा अन्य सार्वजनिक जागा तिथे पोस्टर्स चिटकवण्यात येतात. आजपर्यंत मनपाने एकावरही कायदेशीर कारवाई केलेली नाही. राजकीय दबाव आला, तर कारवाईचे निव्वळ ढोंग रचण्यात येते.