परभणी : जिल्ह्यातील ३ लाख ९६ हजार शेतकऱ्यांना ४०० कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याबाबत शासनस्तरावरुन कारवाई सुरु आहे. केंद्र शासनाकडून आर्थिक मदत मिळण्याचे प्रयत्न सुरु असून बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी आवश्यक निधीची मागणी हिवाळी अधिवेशनात मंजुरीसाठी प्रस्तावित केल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. परभणी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत वाटपाबाबत केंद्र शासनाकडे पाठविलेल्या मागणी पत्रात परभणी जिल्ह्यासाठी केवळ २९९ कोटींची मागणी केल्याबाबत आ. दुर्राणी यांनी आक्षेप नोंदविला होता. १३ मे २०१५ च्या केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधित कोरडवाहू क्षेत्रात हेक्टरी ६ हजार ८०० तर बागायतीसाठी १३ हजार ५०० रुपये आणि फळपिकांसाठी १८ हजार रुपये अशी जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंतची मदत या नियमांप्रमाणे जिल्ह्यातील ३ लाख ९६ हजार शेतकऱ्यांना चारशे कोटी रुपयांची मदत मिळणे आवश्यक आहे. त्याबाबत शासनाने कोणती कारवाई केली आहे, असा तारांकित प्रश्न आ.बाबाजानी दुर्राणी यांनी उपस्थित केला होता. त्यावर खडसे यांनी वरील उत्तर दिले. (प्रतिनिधी)
चारशे कोटींची मिळणार मदत
By admin | Updated: December 20, 2015 23:36 IST