लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गंभीर गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळावर तात्काळ उपलब्ध असलेले पुरावे शास्त्रशुद्ध पद्धतीने गोळा केले जात नसल्याने गुन्हे तपासात व गुन्हा सिध्द होण्यासाठी अडचणी येत होत्या. गुन्हे सिध्द करण्यास मर्यादाही येत असे. त्यामुळे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलींद भारंबे यांनी प्रत्येक पोलीस उप विभागास एक प्रमाणे एक-एक आय बाईक सुरू करण्याबाबत निर्देश दिले होते.पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांच्या हस्ते शुक्रवारी आय बाईक किटचे हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक लता फड, पोलीस उपअधीक्षक अभय देशपांडे, पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक महादेव राऊत, राहुल शेजाळ, अंगुलीमुद्रा उपस्थित होते.आय बाईक म्हणजेच इन्व्हेसिटीगेशन बाईक जालना जिल्ह्यातील चारही पोलीस उपविभागीय कार्यालयात प्रत्येकी एक प्रमाणे चार आय बाईक सुरू करण्यात आलेल्या आहेत. या प्रत्येक आय बाईकवर दोन तपासाचे ज्ञान असलेले कर्मचारी नेमण्यात आले असून, त्यांच्यासोबत तपास कीट आहेत. सदर कर्मचारी यांनी तंत्रशुद्ध पद्धतीने घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्याबाबत विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे.
तपासात घेतली जाणार ‘आय बाईक’ची मदत
By admin | Updated: July 8, 2017 00:31 IST