शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पीडित महिला व बालकांना मदत आणि पुनर्वसनाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2022 06:18 IST

खंडपीठाचे निर्देश; ‘मनोधैर्य योजने’बाबतचा नवीन निर्णय जारी करा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्यातील पोक्सोअंतर्गतच्या सर्व पीडितांना लाभ मिळावा, यासाठी  ‘मनोधैर्य योजने’बाबतचा स्वयंस्पष्ट नवीन शासन निर्णय आदेशापासून चार आठवड्यात जारी करा, असे निर्देश खंडपीठाचे न्या. आर. डी.  धानुका आणि न्या. एस. जी. मेहरे यांनी शुक्रवारी राज्य शासनास दिले आहेत.

या आदेशामुळे याचिकाकर्तीच्या पीडित मुलीसह राज्यातील सर्व बलात्कार पीडित, बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि ॲसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसाहाय्य मिळण्याचा आणि त्यांचे पुनर्वसन होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. 

३० डिसेंबर २०१७ च्या शासन निर्णयापूर्वीच्या पीडितांना या योजनेचा पूर्वलक्षी प्रभावाने (रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट) लाभ दिला जात नव्हता. शासनाची ही कृती भेदाभेद करणारी आणि कुठलाही वाजवी आधार नसलेली आहे, असे निरीक्षण नोंदवीत वरील शासन निर्णयापूर्वीच्या आणि नंतरच्या सर्व पीडितांना योजनेचा लाभ मिळावा, या हेतूने खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला. या आदेशाचा पूर्तता अहवाल सादर करण्यासाठी १३ जून २०२२ रोजी सुनावणी ठेवून याचिका निकाली काढली. 

एका बलात्कार पीडितेच्या आईने  याचिका दाखल केली होती. सदर खटल्यात आरोपीला ११ डिसेंबर २०१७ रोजी  विशेष सत्र न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावास ठोठावला होता. त्याच महिन्यात २० दिवसानंतर ३० डिसेंबर २०१७ रोजी  शासनाने पोक्सो कायद्यांतर्गतच्या पीडितांना ‘मनोधैर्य योजने’चा लाभ देण्याबाबतचा शासन निर्णय जारी केला होता. 

या योजनेचा लाभ याचिकाकर्तीच्या मुलीला मिळावा यासाठी तिने २०१८ आणि २०१९ साली केलेले अर्ज सदर पीडितेला या योजनेचा पूर्वलक्षी प्रभावाने लाभ देता येणार नसल्याचे कारण दर्शवीत नामंज़ूर करण्यात आले होते. म्हणून त्यांनी ॲड. विशाल पी. बकाल यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती.

‘कृती भेदभाव करणारी’n ३० डिसेंबर २०१७ च्या शासन निर्णयापूर्वीच्या पीडितांना योजनेचा पूर्वलक्षी प्रभावाने (रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट) लाभ दिला जात नव्हता. n ही कृती भेदाभेद करणारी आणि कुठलाही वाजवी आधार नसलेली आहे, असे निरीक्षण नोंदवीत वरील निर्णयापूर्वीच्या व नंतरच्या पीडितांना योजनेचा लाभ मिळावा, या हेतूने खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.