लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बिंदूसरा नदीवरील पर्यायी पूल वाहून गेल्याने या पुलाच्या दुरूस्तीचे काम सुरू केले आहे. भराव टाकून हे काम होत आहे. परंतु कायमस्वरूपी पुलाचे काम अगोदरच झाले असते, तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. पाहणी करणे, मागणी करणे, आदेश देणे आणि श्रेयाचे ढोल बडविण्यापलिकडे काहीही झालेले नसल्यामुळे कोणालाच देणे-घेणे नाही, अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.बिंदूसरा नदीवरील मोठा पूल आणि पर्यायी पूल याचे त्रांगडे दोन वर्षांपासून कायम आहे. त्याचबरोबर शहरातून जाणाºया दगडी पुल, नवा पूल आणि अमरधाम लगतच्या पुलाकडेही स्थानिक यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतरच सतर्कतेचा इशारा दिला जातो. नंतर मात्र सर्वच विसरून जातात. दोन दिवसांपुर्वी बिंदुसरा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. पाणी काही प्रमाणात ओसरले असलेतरी येणाºया कालावधीत मोठा पाऊस या भागात झाला तर पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तयार होणाºया पर्यायी पुलाचे काम किती दिवस टिकेल याबद्दल तर्क- वितर्क लढविले जात आहे.रिंंग रोड कागदावरचगत दोन महिन्यापूर्वी पावसामुळे बिंदुसरा नदीवरील पर्यायी पुल खचला होता. त्यानंतर आयआरबी कंपनीने जिल्हा प्रशासनाला ४५ दिवसांत रिंग रोड तयार करून देण्याचे आश्वासन दिले होते. दोन महिने उलटूनही रिंग रोडबद्दल साधी चर्चाही झाली नाही. हा रोड कागदावरच राहिला.तसेच बायपासचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे अश्वासनही कागदावरच राहिले आहे. याचा पाठपुरावा करण्यास जिल्हा प्रशासनही उदासीन असल्याचा आरोप मनविसेचे शैलेष जाधव यांनी केला आहे.मिनी बायपास पक्का करामिनी बायपास रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ते लवकरात लवकर पूर्ण केल्यास या मार्गानेही जड वाहतूक वळविता येऊ शकते. सध्या काही प्रमाणात कच्चा रस्ता असलातरी मिनी बायपास मार्गाने वाहतूक वळविण्याचे प्रयत्न पोलिसांच्या वतीने होत आहेत. त्यामुळे जालना रोड मोकळा श्वास घेत आहे.जालना- औरंगाबादकडून येणारी जड वाहने गढीपासून वळविण्यात येत आहेत. तसेच शहरातील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाला संबंधित क्षेत्रातील ठाण्यांकडून पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देतानाच दक्षतेने काम करण्याचे निर्देश वरिष्ठांनी देण्याची गरजआहे.
जड वाहतूक वळविली तर टळेल कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:45 IST