शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात तीन जिल्ह्यांत दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 13:54 IST

नांदेडमध्ये मालेगाव मंडळात अतिवृष्टी झाली. त्याचप्रमाणे पावसामुळे ८ लाख रुपयांचे धान्य ओले झाल्याने नुकसान झाले.

औरंगाबाद : मराठवाड्यात काही जिल्ह्यांत बुधवारी आणि गुरुवारीही दमदार पावसाने हजेरी लावली. नांदेडमध्ये मालेगाव मंडळात अतिवृष्टी झाली. त्याचप्रमाणे पावसामुळे ८ लाख रुपयांचे धान्य ओले झाल्याने नुकसान झाले. नांदेड जिल्ह्यातीलच  सुरेश जंगू कनाके या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतही पावसाने हजेरी लावली.

नांदेड : मालेगाव मंडळात अतिवृष्टीनांदेड : नांदेड जिल्ह्याच्या विविध भागांत बुधवारी रात्री तसेच गुरुवारीही दमदार पाऊस झाला़ गुरुवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी ७़२६ मि़मी़ पावसाची नोंद झाली असली तरी देगलूर तालुक्यात ४०़६७ मि़मी़ पाऊस झाला असून तालुक्यातील मालेगाव मंडळात अतिवृष्टी झाली. येथे ६५ मि़मी़ पावसाची नोंद झाली असून या पावसामुळे  सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. मागील २४ तासात नांदेड जिल्ह्यातील लोहासह बिलोली, नायगाव, मुखेड आणि मुदखेड तालुक्यात दमदार पाऊस झाला़ मुखेड येथे २१़१४ मि़मी़ पावसाची नोंद झाली असून बिलोली तालुक्यात १२ मि़मी़ तर लोहा तालुक्यात १०़८३ मि़मी़ पाऊस झाला. उमरी तालुक्यात ५़६७, मुदखेड तालुक्यात ५़३३ मि़मी़ पावसाची नोंद झाली. नायगाव तालुक्यातही ८़६० मि़मी़ पाऊस बरसला.

लोह्याला धान्य भिजल्याने ८ लाख रुपयांचे नुकसाननांदेड जिल्ह्यातील लोहा शहरातील मोंढा भागात अडत व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेर  सोयाबीन, हळद, तूर, ज्वारी आदी धान्य पावसाने भिजू नये म्हणून प्लास्टिक कापड झाकून ठेवले होते. मात्र, बुधवारी झालेल्या पावसामुळे नाल्या तुंबल्याने मोंढा भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले़ त्यामुळे धान्य भिजून व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. ८,00,000 रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. मोंढ्यासह रोहिदास नगर, जुना लोहातील कलालपेठ, इंदिरानगर आदी सखल भागातील नागरिकांच्या घरातही नालीचे पाणी शिरल्याने रहिवाशांचीही तारांबळ झाली़ 

परभणी जिल्ह्यात पोषक पाऊसपरभणी : परभणी शहरासह परिसरात गुरुवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस होत असून पिकांना हा पाऊस पोषक ठरत आहे. बुधवारी रात्रीही जिल्ह्यात पाऊस झाला. त्यात मानवत तालुक्यामध्ये सर्वाधिक १६.३३ मि.मी. तर सेलूमध्ये ११.४० मि.मी. पावसाची नोंद झाली.जिल्ह्यात सरासरी ५.८३ मि.मी. पाऊस झाला आहे. यावर्षीच्या हंगामात परभणी जिल्ह्यात सरासरी २११ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारीही ढगाळ वातावरण होते. परभणी शहरात सायंकाळी पावसाने हजेरी लावली. इतर तालुक्यांमध्येही पाऊस होण्याची शक्यता आहे.

हिंगोली जिल्ह्यात पावसाची हजेरीहिंगोली : जिल्ह्यात गुरुवारी पुन्हा विविध भागात पावसाने हजेरी लावली. हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव, डिग्रस कºहाळे, बासंबा, खानापूर परिसरात पाऊस झाला. कळमनुरीसह तालुक्यात करवाडी, म्हैसगव्हाण, नांदापूर, वारंगा फाटा, आखाडा बाळापूर, डोंगरकडा, पोत्रा भागात पावसाने हजेरी लावली. वसमतसह तालुक्यातील आडगाव रंजे परिसरात पावसाने हजेरी लावली. सेनगावसह तालुक्यातील मन्नास पिंपरी, औंढा तालुक्यातील पोटा शेळके परिसरात पावसाने हजेरी लावली. दुपारनंतर जिल्हाभर ढगाळ वातावरण होते. काही भागात रिमझिम तर काही भागात मुसळधार पाऊस पडला.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाRainपाऊसNandedनांदेडHingoliहिंगोलीparabhaniपरभणीagricultureशेती