शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात जोरदार पाऊस, कुंडलिका नदीला पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:56 IST

जालना शहर व परिसरात गुरुवारी पहाटे जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहर व परिसरात गुरुवारी पहाटे जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. कुंडलिका नदीवरील स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती बंधारा ओसंडून वाहिला तर सीना नदीलाही पूर आला होता. बदनापूर तालुक्यातही जोरदार पाऊस झाला.गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तास मुसळधार बरसला. त्यानंतर सकाळी आठ वाजेपर्यंत संततधार सुरूच होती. या पावसामुळे शहरातील सखल भाग जलमय झाला. टाऊन हॉल परिसरात नाल्याचे पाणी रस्त्यावर आल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. शनिमंदिर ते सरस्वती भुवन शाळेपर्यंत खोदलेला रस्ता पावसाच्या पाण्याने तुडुंब भरला. अंतर्गत भागातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली. मामा चौक परिसरातीही नाल्याचे पाणी रस्त्यावर आले. पहाटे झालेल्या पावसामुळे कुंडलिका नदीवरील स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती बंधाºयावरून पाणी वाहिले. तसेच कुडलिका नदीला पूर आला होता. परिणामी रोहणवाडी गावाला जाणारा रस्ता पाण्याखाली गेला होता. त्यामुळे जवळपास दोन तास वाहतूक ठप्प होती. दुपारी पावसाने उघडीप दिली तरी ढगाळ वातावरणामुळे वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारी चारच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाने पुन्हा हजेरी लावली. अर्धा तास जोरदार बरसल्यानंतर जोर ओसरला. जालना तालुक्यातही बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. दरम्यान, गुुरुवारी सकाळी प्र्राप्त आकडेवारीनुसार जालना तालुक्यात ११. ६३, बदनापूरमध्ये २७. ४०, भोकरदनमध्ये २.७५, अंबडमध्ये ३.५७, घनसावंगी २.४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जाफराबाद, परतूर, मंठा तालुक्याकडे मात्र पावसाने पाठ फिरवली. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण सरासरीच्या ५०९.५५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.